पान:आमची संस्कृती.pdf/153

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१४६ / आमची संस्कृती

करण्याची संधी मिळाली म्हणजे आम्हांला हवे ते मिळाले असे मी समजेन.

 समाजातील बायकांचे स्थान
 बायकांचे समाजातील स्थान नेहमीच असे नीच होते का? निरनिराळ्या काळांतील निरनिराळ्या समाजाचे निरीक्षण केलेल्या खालील गोष्टी नजरेस येतात. ज्या समाजातून नांगरटीला जनावरांचा उपयोग माहीत नाही किंवा कुंभाराच्या चाकाचा शोध लागला नाही, त्या समाजात स्त्रिया व पुरुष ह्यांच्यामध्ये समाजातील कामाची वाटणी अगदी चोख असते. एकाच्या कामात दुसल्याने ढवळाढवळ करावयाची नाही असा दंडक सगळीकडे असतो. शिकार करणे, लाकूड तोडणे, नावा व घरे बांधणे व क्वचित विणणे ही कामे पुरुष करतात. बागाईत करणे म्हणजे कंदमुळे व फळझाडे लावणे, निकृष्ट दर्जाची हातशेती करणे, मळ्याची मशागत करणे, पीक काढणे, मडकी घडवणे, वल्कले करणे, वस्त्रे विणणे ही कामे बहुधा स्त्रिया करतात. मळ्यावर पिकणारा माल बाजारात नेऊन संसारोपयोगी इतर वस्तू खरेदी करण्यात त्या मोठ्या हुशार असतात. आफ्रिका खंडात व आशिया खंडात स्त्रियांचा दर्जा फारच नीच आहे तरीसुद्धा काही प्रकारच्या संपत्तीवर स्त्रियांचाच हक्क दिसून येतो. घरातील सर्व चीजवस्तू- भांडीकुंडी, वस्त्राप्रमाणे, दोरदोरखंडे ही नेहमी स्त्रियांच्या मालकीची असतात व नवन्याने हाकून दिले तरी ह्या जिनसा त्याला हिरावून नेता येत नाहीत. तसेच आईच्या पश्चात त्या मुलीला मिळतात. ह्याच्या उलट, शिकारीची हत्यारे, जनावरांची कातडी वगैरे पुरुषांची असतात व ती मुलांकडे जातात. विशेषत: एकापेक्षा अधिक बायका केल्यास प्रत्येकीला स्वतंत्र झोपडी बांधून देण्याची जी आफ्रिकेतील लोकांची पद्धती आहे तिचे कारण हेच असावे. ह्या सर्वांचा अर्थ असा दिसतो की, ज्याने जे उत्पादन केले त्यावर त्याचा हक्क असतो.
 पितृप्रधान समाजव्यवस्थेत मुलीला बापाकडून काही वाटा मिळत नाही, त्याचे ऐतिहासिक कारण वरील जुनी पद्धती असावी, असे काही प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञांचे मत आहेसंस्कृतीच्या कनिष्ठ पायरीवर समाजातील उत्पादनकार्यात श्रमविभाग होता व स्त्रिया उत्पादनाचा मोठा