पान:आमची संस्कृती.pdf/147

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 १४० / आमची संस्कृती

उत्तानपणे वागून आपण इतरांना घृणा उत्पन्न करीत आहोत, इतकी की, बिचारा कंडक्टरसुद्धा या कॉलेज मुला-मुलींमध्ये चाललेल्या प्रकाराला कंटाळून गेला आहे, हे लक्षात आल्यास तसे वागणे होणार नाही. या लहानसहान गोष्टींचा अपहार व मोठ्या सामाजिक आयुष्यात मोठा अपहार, मोठेपणाची तृष्णा व सदैव असंतुष्टता या सर्वांनाच आळा बसेल. नि:स्वार्थी, त्यागी स्त्री-पुरुष आजही समाजात आहेत, पण त्यांच्या उदाहरणाने भागत नाही. समाजाची मूल्ये काय व ती कशी आत्मसात करावी याचे अव्याहत शिक्षण मुलांना मिळाले पाहिजे.

- १९५५