पान:आमची संस्कृती.pdf/143

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१३६ / आमची संस्कृती

करून शाळेत येणाच्या मुलीही कितीतरी होत्या. त्या वेळी रंगीबेरंगी छापील पातळे मिळत नसत. शाळेतल्या मोठ्या मुलींचा पोषाखं म्हणजे हिरवे, काळे, बैंगणी, अशा मळखाऊ रंगांची लुगडी, व पांढरे किंवा चिटाचे पोलके असा असे व लहान मुलींचा खणाचे किंवा चिटाच परकरपोलके असा असे. कोकणात तर रत्नागिरीसारख्या शहरांतसुद्धा मुली क्वचित शाळेत जात व मुले चांगली मोठी होईपर्यंत लंगोटी व सदरा यांखेरीज, शाळेत जाताना काही घालत नसत.
 घरी वडील माणसांचा पोषाखही अगदी साधा असे. परीटघडाच कपडे त्या वेळी माहीतच नव्हते म्हटले तरी चालेल. हल्ली खादा पांघरणाच्या माणसाला सुद्धा परीटघडीचे स्वच्छ पांढरे कपडे घातल्यामुळे जी ऐट येते ती त्या वेळी भलेमोठे रेशमीकाठी धोतरवाल्यालासुद्धा नसे.

 सिनेमा मासिकांनी लावलेले वळण
 हल्ली सर्वच राहणी बदलली आहे. घरात बाहेर पूर्वी कधी पाहिल्या नाहीत त्या गोष्टी दिसत आहेत. मागच्या पिढीचा पांढरपेशा वर्ग पूर्वीच्या गरिबीतून चांगलाच वर आल्यामुळे त्यांची मुले सुखवस्तू घरातून ना लागली आहेत. त्यांची राहणी पूर्वीसारखी कशी असणार? पूर्वी शिक्षण फळ म्हणजे चांगली नोकरी मिळे किंवा तिची आशा सोडली तर समाज राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातं चटदिशी पुढारीपण मिळत असे. हल' पैसा व मान या दोन्ही गोष्टींनी बी.ए. डिग्रीपर्यंतचे शिक्षणाला आत कमी किंमत आहे. व वरचे शिक्षण घेण्याची ऐपत, पात्रता व स्वार थोड्यांनाच आहे. त्या काळी शाळा-कॉलेजांतील शिक्षण एवढाच एक उन्नतीचा मार्ग लोकांपुढे होता. आता हळूहळू दुसरे मार्ग उत्पन्न होऊ लागले आहेत. पण त्यावर जाण्यास लोकांची मने तयार नाहीत. * पाढरपेशा वर्गातून शिक्षणाला अतिशय मान असे. शाळेच्या मास्तरा तुच्छ उद्गार सहसा ऐकू येत नसत. हल्ली पुढारी म्हणविणारे लोकच अवेळी सकारण अकारण शिक्षणाबद्दल अतिशय अनुदार उदगार का पूर्वी मुलगा नापास झाला तर आईबाप हळहळत असत. हल्ली मु' तिमाही सहामाही किंवा आठवड्याच्या परीक्षांचे वृत्तांत कळवून त्याची दखल घेणारे आईबाप मिळत नाहीत. आपला मुलगा किंवा काढतात. च्या तात कळवूनसुद्धा गा किंवा मुलगी