पान:आमची संस्कृती.pdf/141

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१३४ / आमची संस्कृती

स्वत:च्या बायकोवर प्रेम असलेले ह्यांना बघवत नाही, नातवंडे आपल्या आईभोवती पिंगा घालताना बघवत नाही, कोणी काय खावे, कसे खावे, किती खावे, काय ल्यावे वगैरे सर्व गोष्टींवर त्या हुकूमत ठेवू पाहतात. अपु-या वासनांचे हे जिवंत भूत ज्या संसारात असेल तो संसार किती भयानक असेल हे सांगणे नकोच.

 त्यागाचे स्वरूप बदलून गेले
 अशा चारी त-हेच्या स्त्रिया आजही पुष्कळ ठिकाणी दिसतात. पण समाजाच्या ज्या परिस्थितीमध्ये त्या निर्माण झाल्या ती परिस्थितीच पांढरपेशा वर्गात बदलली असल्यामुळे प्रत्येक कुटुंबातून त्या दिसत नाहीत. किंवा त्यागाचे स्वरूपच बदलून गेले आहे असे म्हणणे जास्त बरोबर होईल. आपण अविवाहित राहन भावांचे किंवा बापाचे संसार करणारे स्त्री-पुरुष माझ्या पाहण्यात आहेत. अशांचा त्याग गतकालीन विधवांपेक्षाही जास्त सरस वाटतो. आपल्या भावंडांकडे किंवा आपल्या आईबापांकडे दुर्लक्ष करून स्वत:चा संसार थाटणारे कितीतरी असतातथोडा स्वार्थ, थोडा परार्थ करणारेही असतात. पण स्वत:चे सुख बाजूस सारून परार्थ आयुष्य झिजवणारे खरोखर विरळा. समाजाने अशान" स्वार्थाचा मार्ग मोकळा ठेवला असूनही ते तो टाळतात. दुसरा मार्ग मोकळा नसल्याने संन्यस्त जीवन कंठणाच्यांपेक्षा हा हल्लीच्या युगात का कधी दिसणारा संन्यास मला जास्त मोलाचा वाटतो.

 दोन पिढ्यांत बदललेले जीवन
 अशा स्त्रिया कुटुंबामध्ये असल्यामुळे व त्यांच्या शिकवणीमु मलांच्या मनावर योग्य परिणाम होई व आता तसा होईनासा झाला आ९ असा दुसरा मुद्दा कोणी काढतात. या मुद्याच्या बुडाशी खरोखर दोन विधान आहेत. हल्लीची मुले पूर्वीच्या पिढीइतकी कष्टाळू, विनयशील, समाधान व त्यागी नाहीत हे एक विधान व ती तशी होण्याला लागणारे आदर्श स्त्री परुष, विशेषत: स्त्रिया सध्याच्या कुटुंबातून नाहीत, हे दुसरे विधाः यांपैकी दुस-या विधानाबद्दल त्रोटक चर्चा वर केलीच आहे. आता राहि पाहिले विधान. त्याबद्दल विचार करू. पूर्वीच्या पिढीतील मुलांचे व