पान:आमची संस्कृती.pdf/139

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१३२ / आमची संस्कृती

 विधवा त्यागमूर्ती की कारुण्यमूर्ती
 पूर्वीच्या विधवा बायांची तपस्या तर ह्या साधुंहूनही खडतर वाटते. साधू व स्वामीजी नेहमी इतर साधू व शिष्य-परिवार ह्यांचे संगतीत असतात. अध्ययन व चिंतन ह्यांत वेळ घालवतातत्यांच्या तपस्येबद्दल समाज त्यांचा आदर करतो. वयाच्या अकराव्या की आठव्या वर्षी क्षणभरच्या उभाळ्याने का होईना, न समजता, वडील माणसांच्या भरीने का होईना, पण त्याने स्वत:हून संन्यासदीक्षा घेतलेली असते. बिचाच्या जुन्या काळच्या विधवेची तपस्या सर्व बाजूनी जास्त खडतर असे. कोवळ्या वयात लगन म्हणजे काय हे नीट समजायच्या आधीच तिचे लग्न झालेले असे. गृहस्थाश्रमाच्या सर्व जबाबदारीची जाणीव नसली, शरीरसुखाची कल्पना नसली तरी दागदागिने, कपडेलते वगैरे सौभाग्यश्रृंगार करण्याची, मंगळागौरीसारखी गोड व्रते पाळण्याची, सासरमाहेर, माहेरसासर अशा फेच्या घालण्याची तर तिची खासच कल्पना असणार. अशा वेळी विधवा होणे म्हणजे केवढा आघात! गृहस्थाश्रमाची पहिली पायरी चढतानाच जबरदस्तीने बिचारीला संन्यासाची दीक्षा मिळे. लगेच मुंडण, कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे हे विधी होऊन तांबडे वस्त्र मिळे. नाही अभ्यास, नाही लिहिणेवाचणे. नाही मननध्यानकेवळ शारीरिक कष्ट मात्र तिच्या नशिबी असत. समाजात मान-सन्मान तर दूरच, पण ती म्हणजे एक चालताबोलता अपशकुन असे. लग्न, मुज५ मंगळागौर, डोहाळजेवण, बारसे, असे गृहस्थाश्रमाचे सुखसोहाळे घरी चालले म्हणजे मरमर काम करायचे, पण कुणाला आपले तोंड दाखवावयाचे नाही, अशी शिस्त असे. जैन साधु निदान गृहस्थापासून चार हात लांब राहतात; पण बिचान्या विधवेला गृहस्थाश्रमी होणान्या पूर्वीच्या काळच्या, अत्यंत सूचक अशा सोहळ्यात राहून संन्यासी राहणे भाग होते. त्यांना त्यागमूर्ती म्हणावे, की कारुण्यमूर्ती म्हणावे, की समाजाच्या कठोरतेची चालती बोलती निदर्शने म्हणावे हे ज्याचे त्याने ठरवावे .
 विधवांच्या वागण्याचे चार प्रकार
 अशा स्त्रियांचे चार पंथ मी पाहिले आहेत. काहींच्या सुखलोलुप