पान:आमची संस्कृती.pdf/137

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१३० / आमची संस्कृती

नाना प्रश्न उद्भवतात. ह्या प्रश्नाचे उत्तर 'हो' किंवा 'नाही' असे नुसते देऊन भागणार नाही. मागच्या पिढीत घरांतले वातावरण काय होते हे पण पाहिले पाहिजे.

 पूर्वीच्या स्त्रीचे जीवन चार भिंतीत
 मागच्या पिढीतील स्त्रियांचे जीवन सर्वस्वी घराच्या चार भिंतीत होते.
 जरी अशा काही स्त्रिया होऊन गेल्या, की त्यांनी नव-याच्यामागे शेतीवाडी व मोठ्या संसाराची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली, तरी त्यामुळे वरील विधानाला बाधा येत नाही. आजच्या चर्चेत हे लक्षात ठेवले पाहिजे की, कुठचाही नियम सांगितला की, त्याला अपवाद असणारच. चर्चा जिवंत समाज व त्यातील जिवंत व्यक्तीविषयी असल्यामुळे कोणत्याही गोष्टीबद्दल ठाम निरपवाद असे विधान करणेच शक्य नाही. काही स्त्रिया काही विशिष्ट परिस्थितीत मोठमोठ्या जबाबदा-या पार पाडीत, पण एकंदरीने त्यांचे आयुष्य चार भिंतीत, मोठ्या कुटुंबात असे.
{{अशा ब-याच कुटुंबात एखाददोन विधवा बाया असत. त्या कधी गादीवर निजत नसत, रात्रीचे जेवत नसत, त्यांचे उपासतापास बरेच असत, बहुधा घरातील मुख्य स्वैपाक (दुपारचा) त्याच करीत व संध्याकाळचा स्वैपाक दुस-या कोणी केला तर त्या अंगणात मुलांना सांभाळीत बसत, त्यांचा पोषाख नेहमी तांबड्या कावेच्या रंगाचे लुगडे असा एक वस्त्राचा असे. चोळी असलीच तर बिनकाठाची पांढरी असे. कधी त्या एवढे तेवढे फराळाचे, उपवासाचे घेऊन खात बसल्या तर भोवती मुले गोळा होऊन त्यांतील काही भाग फस्त करीत. अशा बायका त्याग व सेवा ह्यांच्या मूर्तीच होत्या असे कित्येकांचे म्हणणे आहे.

 त्याग केला की करवला गेला?
 ह्याबद्दलचे माझे म्हणणे काय ते समजण्यासाठी मी एक उदाहरण घेते. काही दिवसांपूर्वी तीन जैन साधुनी आमच्या घराला भेट दिली. है। साधू जैनांच्या तेरापंथी संप्रदायापैकी होते. त्यांना स्वत:चे घरदार नव्हते. पाच घरी मागून जे अन्न मिळेल तेवढेच ते दिवसातून एकदा खातात. हिंसा