पान:आमची संस्कृती.pdf/136

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आमची संस्कृती / १२


११. दोन पिढ्या तरुण पिढीला वळण का नाही?
 रत्नागिरीचे श्री. आप्पासाहेब पटवर्धन ह्यांनी आपल्या आयुष्याच्या आठवणी देताना एका व्यक्तीचे एक लहानसेच, पण हृद्य चित्र रंगविले आहे. ती व्यक्ती म्हणजे आप्पासाहेबांची आत्याबाई. ह्या आपल्या भावाशेजारी बि-हाड करून, अति दारिद्यात, पण मानाने राहत असत. वयाने मोठ्या असूनही आपल्या लहान भाचरांच्या खेळण्या-बागडण्यात त्या भाग घेत, वेळप्रसंगी आपल्या उदाहरणाने, शिकवणुकीने आयुष्यातील मूल्यांचे ज्ञान देत व त्याबरहुकूम थोडीबहुत कृती करवीत. त्या लवकर वारल्यामुळे लहान भावंडांना त्यांचे दर्शन व मार्गदर्शन दोन्हीही झाली नाहीत, म्हणून लेखकाला फार हळहळ वाटते. अशा व्यक्ती हल्ली समाजात नाहीत म्हणून तरुण मुलामुलींना नीट मार्गदर्शन होत नाही असे काहींचे म्हणणे आहे. अशा बायकांसारख्या व्यक्ती आज दिसत नाहीत व पूर्वी घरोघर होत्या असे स्पष्टपणे व मोठेपणे कोणी कदाचित म्हणणार नाही, पण बहुतेकांच्या मनातून तसे असते. खरोखरच अशा त्यागी व्यक्ती कुटुंबात हल्ली सापडत नाहीत का? त्या नसल्यामुळे हल्लीच्या तरुण पिढीला लागावे तसे वळण लागत नाही, असे म्हणता येईल का? हल्लीच्या मुली, मुलगे पूर्वीच्या पिढीपेक्षा वागुणकीने हीन आहेत का? असे