पान:आमची संस्कृती.pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१२८ / आमची संस्कृती

केल्यासारखे होते असे म्हणणेही सर्वस्वी चूक आहे. सर्व भाषा एका पायरीवरच्या समजाव्या व कोणत्याही एकीला केंद्रीय भाषा म्हणून प्राधान्य देऊ नये.
 ३.प्रत्येक घटकाची भाषा निरनिराळी झाली तर सर्वांना एकमेकांशी संबंध ठेवण्यास व केंद्रीय राज्याची म्हणून एक भाषा हवीच. त्याशिवाय बाहेरच्या जगाशी राजकीय संबंध ठेवण्यास व पाश्चात्यांची विद्या हस्तगत करण्यास एका भाषेची आवश्यकता आहे. ती इंग्रजी असावी. मॅट्रिकच्या आधी तीन वर्षे ही भाषा शिकवण्यास सुरुवात करावी. शिकवण्याचा उद्देश वाचता यावे व सोपे बोलता व लिहिता यावे इतकाच असावा. विद्यापीठातील सर्व वर्गांना ही भाषा आवश्यक असावी व तेथेही उद्द। वाङमयीन प्रवीणता व सखोल अभ्यास नसून, फक्त शुद्ध लिहिता, बोलता येणे व वाचता येणे एवढाच असावा.
 ४.भारतातील सर्व भाषा शक्य तितक्या लौकर एका लिपति लिहिण्याची व्यवस्था व्हावी. कोठच्याही एका भाषेला प्राधान्य नसल म्हणजे आपली लिपी सोडण्यास निरनिराळे भाषिक तयार होतील व एक लिपी झाली म्हणजे आंतरप्रांतीय वाङमय वाचण्याची जिज्ञासा उत्पन्न होईल. आंतरप्रांतीय सांस्कृतिक दळणवळण वाढून भारतीय संस्कृतीत भर पडेल.
 ह्या योजनेने सर्व भाषांना सारखे स्थान मिळेल. कोणत्याही एका गटाचा भाषेमुळे फायदा होणार नाही. सर्वांचे शिक्षण भारतीय भाषांमध्यच होईल. इंग्रजी फक्त आंतरप्रांतीय व आंतरदेशीय दळणवळणाचे साधन राहील. इंग्रजी ही सर्वांनाच परकी असल्यामुळे एकाला फायदा एकाला तोटा असे होणार नाही. प्रत्येकाला स्वभाषा व इंग्रजी अशा दोनच भाषा शिकाव्या लागतील. हल्ली तीन शिकाव्या लागतात. शिक्षणक्रम सुटसुटा होतील. व सर्व देशाची लिपी एक झाल्यास बहुरूपी भारतीय संस्कृतीचा वाङमयद्वारा आस्वाद घेण्यास सर्व भारतीयांना सोपे जाईल. घटक राज्यात जवळजवळ सर्व नोक-या त्या त्या भाषिकांना मिळतील. काहीं था अपवाद होतील. पण इतरांना ज्या प्रांतात राहावयाचे तेथली भाषा शिकावी लागेल.