पान:आमची संस्कृती.pdf/133

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१२६ / आमची संस्कृती

वाटले असल्यास नवल नाही. सर्व हिंदुस्थानात सर्व प्रांतांतून राजभाषा म्हणून पोटासाठी, व संपन्न वाङमयाच्या लालचीने कित्येक लोक ही भाषा आवडीने शिकले, ह्याच लोकांनी समाजसुधारणेचा व स्वातंत्र्य लढ्याचा झेंडा उभारला. स्वतंत्र भारताची घटना मूळ ह्या भाषेतच घडली व नंतर तिला देशी स्वरूप दिले गेले. ह्याच भाषेच्या द्वारे पाश्चात्त्यांच्या ज्ञानाचे भांडार भारतीयांना खुले झाले.
 इंग्रजी भाषा बोलता येणारे बहुतेक भारतीय जन्माने आपली स्वत:ची अशी भारतीय भाषा बोलणारे होते व आहेत. पण काही अल्पसंख्याक, विशेषत: मिश्र इंग्रज रक्ताचे लोक आपण राज्यकत्र्यांच्या रक्ताचे व त्यांना जवळचे ह्या भावनेने की काय, भारतीय भाषांचा त्याग करून इंग्रजीच आपली मातृभाषा म्हणून मानू लागले. अशांना इंग्रजी राजवटीत लाभही चांगला झाला व कित्येक दृष्टींनी हे लोक भारतीय संस्कृती व समाजजीवन ह्यांपासून अलिप्त राहिले. ह्यांची जन्मभूमी व कर्मभूमी भारतच असल्यामुळे इंग्रजांचे कितीही अनुकरण ह्यांनी केले तरी त्यांना इंग्रजी संस्कृती कधीही आत्मसात करता आली नाही. हिंदुस्थानातील सर्व प्रांतात हे लोक विखुरलेले आहेत.
 इंग्रजी राज्यात सर्व प्रांतांतील लोकांना नोक-या लागत व या सर्व नोकरांच्या सर्व देशभर बदल्या होत. अशा लोकांना इंग्रजी भाषेमुळे परस्पर दळणवळण करता येई व इंग्रजी शिक्षणामुळे नोकरीतही लाभ मिळ: ह्यामुळे सरकारी नोकरांत, विशेषत: वरच्या पगाराच्या सरकारी नोकराच्या कुटुंबातूनही मुलांना लहानपणापासून इंग्रजी शिक्षण देण्याचा प्रघा वाढला व ही कुटुंबेही भारतीय भाषांना तुच्छ लेखु लागली. ह्याचा असा परिणाम झाला की, भारतीय वंशाचे असूनही ह्यांपैकी कित्येक लोक इंग्रजी आपली जन्मभाषा म्हणून सांगू लागले.
 बहुतेक शाळांतील वरच्या वर्गातून व विद्यापीठातून इग्रज बोधभाषा असल्यामुळे सर्वच उच्च शिक्षण बहुजन समाजाला कठीण होऊ बसले. अशा परिस्थितीत स्वातंत्र्य मिळून भारताचे स्वतंत्र प्रजासत्ताक ग्रंयक्त राज्य प्रस्थापित झाले. प्रजासत्ताक राज्याची भाषा काय असावा, ९ पुश्न उपस्थित होऊन ती हिंदी असावी असे घटनेत ठरले. पण अजून लोकमत सर्वस्वी त्या बाजूने नाही व विशेष विरोध दाक्षिणात्यांचा आहे.