पान:आमची संस्कृती.pdf/129

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१२२ / आमची संस्कृती

भाषा विविध असूनही दोन महायुद्धांच्या प्रखर कसोटीला ह्या देशाचे एकराष्ट्रीयत्व उतरले आहेह्या गोष्टी आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.
 सोव्हिएत रशिया मात्र एक प्रचंड बहुभाषिक राष्ट्र आहे. रशियन भाषा ही केंद्राज्याची वा संघराज्याची भाषा आहे व घटक राज्यात बोलणे, शिक्षण व राज्यव्यवहार त्या त्या राज्याच्या भाषेतून चालतो.
 रशियाची व भारताची परिस्थिती वरवर दिसायला सारखी दिसते व भाषाविषयक प्रश्नही भारताने थोडासा रशियाच्या धर्तीवरच सोडवल्यासारखा दिसतो. पण खरोखर पाहता सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्टीने रशिया व भारत ह्यांमध्ये फार मोठा फरक आहे व म्हणून रशियाचे उदाहरण उपयोगी पडण्यासारखे नाही.
 रशियामध्ये कित्येक शतके रशियन भाषा बोलणारे लोक राज्यकर्ते होते. रशियात अस्तित्वात असलेले शास्त्र, वाङमय, संस्कृती व सर्व तन्हेचे शिक्षण ही रशियन भाषेतच केंद्रित झालेली होती. त्याचप्रमाणे ज्या राजकीय तत्त्वज्ञानाचे पुढारीपण आजच्या जगात रशियाकडे आहे, त्या तत्त्वज्ञानातील बरेचसे वाङमय रशियन भाषेतच आहे. कार्ल मार्क्स व एंगेल्स हे दोघे जर्मन भाषिक जरी त्या तत्वप्रणालीचे जनक असले तरी त्या तत्त्वांचे प्रमुख भाष्यकार व प्रचारक लेनिन, बुखारिन, स्टालिन वगैरे सर्व रशियनच होते. म्हणून आजच्या रशियन संघराज्याची राजकीय, सांस्कृतिक व ऐतिहासिक भाषा रशियन हीच ठरते. रशियातील घटक राज्यांपैकी कोठच्याही भाषेचा इतिहास वा वाङमय रशियन भाषेच्या तोडीचे नसल्यामुळे ती भाषा संघराज्याची भाषा व्हावी हे नैसर्गिकच होते. असे असूनही सध्याच्या रशियन राज्यकर्यांनी घटक राज्यांतील ज्याना लिपीदेखील नाही अशा भाषा जिवंत ठेवून सर्व शिक्षण त्या त्या भाषेतून देण्याची व्यवस्था केली आहे, ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे.

 भारताची वेगळीच परिस्थिती
 ह्याउलट, भारतात सर्व उत्तरेकडच्या भाषा सांस्कृतिकट्या एकाच पायरीवर आहेत. सुमारे १००० वर्षांपूर्वी प्राकृत भाषांपासून त्यांचा जन्म झाला व प्रत्येकीने आपापले बाङमय निर्माण केले. मला असे वाटते का’ बंगाली, मराठी व गुजराथी ह्या भाषांचे वाङमय उत्तरेकडच्या सिंधी,