पान:आमची संस्कृती.pdf/127

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१२०/ आमची संस्कृती
नरकाला नेणारे आहेत असे आपण भारतीय कधीच कबूल करणार नाही. समाजजीवन जगण्याचे व समाजकल्याण साधण्याचे मार्गही निरनिराळे असणार व त्या मार्गावरचे पांथस्थ एकमेकांना मदत करून समाजाचे हित साधू शकतील. भारतीय समाज व भारतीय संस्कृती ह्यांबद्दल वर दर्शविलेल्या भूमिकेवरून हा लेख लिहिलेला आहे.
 भारतात भाषाविषयक प्रश्न घटनेत एका दृष्टीने सोडवलेला आहे. त्याचा आता ऊहापोह असा विचार कोणाच्या मनात येईल. पण का, राष्ट्रांत- त्यांतूनही नवीन राष्ट्रांत- कोणच्याही प्रश्नांवर परत नव्याने विचार होऊ नये असे थोडेच आहे? सर्वांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर जितका तात्त्विक विचार होईल तितके उत्तमच.
 भारत हे एक संघराज्य आहे. जी अनेक लहानलहान राज्ये मिळून हा संघ झाला आहे त्यांत निरनिराळ्या भाषा बोलतात व लिहितात. म्हणून भाषाविषयक प्रश्नाचा विचार मुख्य तीन बापूंनी झाला पाहिजे.
१. घटक राज्यात प्रत्येक बोलभाषा, बोधभाषा व राज्ययंत्र हाकण्याची भाषा कोणती असावी?
२. घटक राज्याचा जेथे परस्परसंबंध येईल तेथे संघराज्याच्या विधिमंडळात, संघराज्याच्या केंद्रीय कचेरीत, केंद्रीय नोकरीच्या परीक्षांसाठी वगैरे, म्हणजेच संघराज्याची अशी कोणती भाषा असावी?
३. भारतीय संघराज्याच्या बाहेर जगातील इतर सर्व राष्ट्रांशी दळणवळण ठेवण्यास कोणती भाषा असावी?

 इतर बहुभाषिक राज्ये
 भारतीय संघराज्य हेच काही एकमेव बहुभाषिक राज्य जगात नाहा इतरही बहुभाषिक राज्ये आहेत. ती भारतापेक्षा जुनी आहेत. त्यांनाही हा . प्रश्न असणारच. त्याचा उदाहरणे आपल्याला उपयोगी पडणार पडला नाहीत का?
 भारताची सांस्कृतिक व राजकीय परिस्थिती इतर बहुभाषिक राज्यांपेक्षा बरीच निराळी आहे आणि इतरांचे उदाहरण भारतीय समस्या सोडवण्यास उपयोगी पडणार नाही. कसे ते खालील विवेचनावरून स्पष्ट