पान:आमची संस्कृती.pdf/124

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आमची संस्कृती / ११७

घेऊन भागणे शक्य नाही. कारण कायद्याप्रमाणे अशा मुलाला राज्य मिळणेच शक्य नाही व निर्देश होऊ नये म्हणून राजमातेला मुलगीच दत्तक घ्यावी लागेल व अशा मुलीचा मुलगा राज्याचा अधिकारी होईल. अशा तर्हेने त्रावणकोर राजघराण्यात पूर्वी मुलगी दत्तक घेतल्याचे नमूद आहे त्याचप्रमाणे परिस्थिती मुरुमकट्टायम ब आळियसंथानम पद्धतीने ज्यांच्यात वारस जातो त्याच असणारतसेच आसामात हिंदू खासी राजघराणी आहेत त्यांची रूढीही त्रावणकोरप्रमाणेच आहे त्यांच्यातही मुलगी दत्तक घेतल्याचे नमूद आहे. तेव्हा अशा सर्वांना मुलगी दत्तक घेण्याचा अधिकार ठेवलाच पाहिजे व तो कुमारी स्त्रीलाही क्वचित प्रसंगी बजावण्याचा हक्क ठेवावा लागेल हे उघडच आहे.अशा परिस्थितीत कोणाही पुरुषाने व स्त्रीने स्त्रीला व पुरुषाला दत्तक घेण्याचा अधिकार ठेवला तर तो कायदा सर्वव्यापी व सर्वांच्याच सोईचा होईल.
 आपला हिंदू समाज हा एक जगातील प्राचीनतम समाजांपैकी आहे हिंदू या नावाखाली असंख्य वंश, असंख्य संस्कृती व असंख्य जमातींचे एकीकरण कमीत कमी चार हजार वर्षे अव्याहत चालू आहे. ह्या जमातींच्या रूढी निरनिराळ्या आहेत. काही पितृप्रधान कुटुंबपद्धती नाहीत तर काही अगदी जवळच्या सपिंडांत लग्ने करतातकाहींत सर्व मुलाना सारखा वाटा मिळतो, तर काहींत फक्त मोठा मुलगाच बापाच्या संपत्तीचा वारस असतो; काहींच्यात मुलांचा हुंडा घेतात तर काहींच्यात मुलींचा हुंडा घेतात; काहींच्यात विधवांना पुनर्लग्नाची परवानगी आहे काहींच्यात विधवा फक्त धाकट्या दिराशीच लग्न करू शकतात. तर काहींच्यात पुन्हा विवाह करताच येत नाही; काही समाज कृषिप्रधान काही बाणिज्य करणारे, काही पशुपालन करणारे तर काही केवळ वन्य स्थितीत आहेत. अशा सर्वांना सर्व बाबतीत एक कायदा करणे हे अवघड जवळजवळ अशक्यप्राय काम आहे. सध्याच्या रूढींतील अन्यायाचे परिमार्जन व्हावे व तेवढ्यापुरता कायद्याचा भाग सर्वांना लागू करावा हे योग्य आहे व इतर बाबतीतउदाहरणार्थ आते-माने भावंडांचे व मामा भाचीचे लग्न व नांबुढी वारसा व विवाहपद्धत अशासारख्या रूढींचा अभ्यास करून त्यांतील समाजविघातक खरोखरीच कोणत्या आहेत हे