पान:आमची संस्कृती.pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

११६ / आमची संस्कृती

वा नसो, तो १५ वर्षे वयाचा असल्यास दत्तक घेण्याचा अधिकार दिला आहे पंधरा.वर्षे वयाच्या मुलम्याला लग्न करण्यास कायद्याने हल्ली मनाई आहे, इतकेच नव्हे तर पधरा वर्षे वयाचा मुलगा संतती उत्पादन करण्यास तरी समर्थ असेल की नाही कोण जाणे. अशा वयात त्याला मुलगा दत्तक घेण्याचा अधिकार असावा हे विचित्र नाही काय? जो मुलगा कायद्याने पती होऊ शकत नाही तो पिता होऊ शकतो. त्याला समितीच्या सभासदांकडून असे कारण देण्यात आले की, १५ वर्षे वयाचा मोठ्या इस्टेटीचा एकच एक वारस रोगाने लवकरच मरणार असे झाले तर त्याला दत्तक घेण्याचा प्रश्न उदभवतो व त्यासाठी ही वयोमर्यादा घातली आहे. तसे असेल तर मग कोणत्याच तन्व्हेची वयोमर्यादा घालण्याचे कारणच नाही. एखादा मोठ्या इस्टेटीचा आईबाप नसलेला एकमेव वारस पंधरा वर्षांचे आतही मृत्युमुखी पडण्याचा संभव आहेच. तेव्हा अशा वेळी कोणातरी नातेवाईकांस किंवा इष्टामित्रांस त्याचे वय काहीही असले तरी त्याच्याकडून दत्तविधान करवून घेता येईलच. धार्मिकदृष्ट्या दत्तक घेणारा मुंज झालेला असला पाहिजे असे असल्यास, फार तर ते बंधन घालता येईल, पण दुसरे बंधन असू नये किंवा असलेच तर निदान हल्लीच्या कायद्याप्रमाणे लग्नाच्या वयोमर्यादेशी विसंगत नाही अशी वयोमर्यादा तरी घालावी.
 नव्या हिंदू कायद्यामुळे स्त्रियांना बापाच्या इस्टेटीचा काही भाग मिळण्याची व्यवस्था झाली आहे त्याचप्रमाणे बच्याच स्त्रिया स्वतंत्र राहून मिळवूही लागल्या आहेत. अशा कुवार स्त्रियांना दत्तक घेण्याचा अधिकार का नसावा ते समजत नाही. एखादी बाई विधवा असेल तर मात्र तिला दत्तक घेता येतो. पण ज्याप्रमाणे कुवार पुरुषाला दत्तक घेण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे कुमारी स्त्रीला तो अधिकार का दिला नाही हे समजत नाही.
 त्याचप्रमाणे मुलगी दत्तक घेणे व देणे बेकायदेशीर मानले आहे. हे मत बहुसंख्य हिंडूच्या रूढीला जुळेल असे आहे. ज्या हिंढंमध्ये पण मुरुमकट्टायम किंवा आळियसंथानम पद्धतीने वारस जातो तेथे त्यांच्यात मुलगी दतक घेतल्याशिवाय चालणे शक्यच नाही. उदाहरणार्थ, त्रावणकोर संस्थानात राज्याचा वारस राजाचा मुलगा नसून राजाच्या बहिणीचा मुलगा असतो. राजाला बहीण नसेल तर राजाला किंवा राजमातेला मुलगा दत्तक