पान:आमची संस्कृती.pdf/118

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / १११

घडवून आणण्याचा प्रयत्न न करता फक्त एकपत्नित्वाचे कलम त्यांना लागू करणे म्हणजे त्या समाजाचा नाश करणे होय.
 एकदा लग्न झाले म्हणजे जे नवे कुटुंब स्थापन होते, त्यांतील नवराबायकोनी एकोप्याने, गुणागोविंदाने आमरणान्त राहणे, ही स्थिती उत्तम. असल्या कुटुंबातील मुख्य माणसांच्या संतोषाची, सौख्याची व प्रेमाची सावली कुटुंबातील सर्व माणसांवर व विशेषत: कुटुंबात वाढणाच्या मुलांवर पडते, व आयुष्यातील महत्त्वाच्या संस्कारक्षम वयात त्यांच्या मानसिक विकासाला योग्य वातावरण मिळते. अशी कुटुंबे ज्या समाजात अधिक तो समाज कार्यक्षम व प्रगतीपर आहे, असे समजावयास हरकत नाही. सर्वच कुटुंबांतून अशी परिस्थिती असली तर उत्तमच. पण मृत्यू, रोग, दारिद्य व परस्परांचे निरनिराळ्या कारणांनी अननुरूपत्व ह्यांमुळे पुष्कळ कुटुंबात नवराबायकोचे पटत नाही. अशा वेळी घरात असंतोष, मारहाण, कुरकूर कायम ठेवून नवराबायकोने एकत्र राहिलेच पाहिजे, असा आग्रह धरणे समाजविघातक व अन्याय्य ठरेल, व म्हणून कोणत्याही कारणामुळे, जर नवराबायकोचे पटणे शक्य नसेल, तर लग्नविच्छेदनाची परवानगी असावी. ह्या विच्छेदनाच्या परवानगीसाठी सध्या अस्तित्वात असलेली कोर्ट व न्यायदानपद्धती मुळीच उपयोगी नाहीत. सध्याच्या कोर्टात असले खटले जाणे म्हणजे दोन्ही पक्षांनी रागाच्या भरात एकमेकांवर भलतेसलते खरेखोटे आरोप करणे, त्यातच वकिलांनी आपापल्या अशिलांची बाजू मांडण्याच्या भरात कौटुंबिक भांडणात भर घालणे व ह्या सर्व प्रकाराचे वर्तमानपत्रातून जाड टाईपात येणारे खुसखुशीत वर्णन, ह्यांमुळे ही भांडणे मिटण्याऐवजी वाढण्यासच मदत होईल. नव्या हिंदु कोडामध्ये घटस्फोटासाठी जी कारणे घातली आहेत, ती इतकी विकृत आहेत की, नवराबायकोने परस्परांची अब्रू चव्हाट्यावर आणल्याखेरीज त्यांना कधीही घटस्फोट मिळणे शक्य नाही. नव-याला किंवा बायकोला असाध्य व सांसर्गिक (!) रोग सतत सात वर्षे झाला असेल व तो लग्नाच्या सहचा-यापासन झाला नसेल तर घटस्फोट मिळण्याची व्यवस्था केली आहे! नवन्याचा किंवा बायकोचा सांसर्गिक रोग सात वर्षे सहन करणे व नंतर काडीमोड मिळणे ही सवलत काही अजब आहे! ही अशी निरनिराळी कारणपरंपरा