पान:आमची संस्कृती.pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

११० / आमची संस्कृती

असेल तर ते नांबुद्री स्त्रियांचे. नंबुद्री लोकांचा वारसा कायदा व लग्नाची रूढी फार चमत्कारिक आहे. ह्यांच्यात फक्त मोठा मुलगा सर्व इस्टेटीचा वारस होतो व तेवढ्यालाच फक्त लग्न करण्याचा अधिकार असतो. ह्या रूढीमुळेच सर्व धाकटे मुलगे अविवाहित राहतात व ते त्याच प्रांतातील नायर बायकांशी संबंधम नावाच्या प्रकाराने संबंध ठेवतात. ह्या संबंधाची संतती नायर स्त्रीची होते. (नायर लोकांत मातृप्रधान कुटुंबपद्धती आहे) व त्यांच्या पोषणाची जबाबदारी नांबुद्री कुटुंबावर पडत नाही. आता स्वतंत्र नोकरी करणा-या नांबुद्रीनी असा संबंधम केला तर त्याला कायदेशीर विवाह समजण्यात येऊन ती संतती कायदेशीररीत्या त्या नांबुद्रीची व्हावी असा कायदा आला आहे, पण त्या संततीला एकत्र कुटुंबाच्या इस्टेटीत भाग नाही. ह्या रूढीमुळे जो थोरला मुलगा लग्न करतो त्याला स्वत:च्या बहिणींची लग्ने करून द्यावयाची असल्यास ब-याच बायका कराव्या लागतात. कारण दरवेळी माझ्या बहिणीशी तू लग्न केलेस तर मी तुझ्या बहिणीशी लग्न करीन, अशा अटीवरच दुस-या एका नंबुद्री कुटुंबांतील वडील मुलाशी बहिणीचे लग्न करावे लागते. काही नांबुद्री (थोरले मुलगे) बहुपत्निक असतात.ब-याच धाकट्या मुलांना अविवाहित राहावे लागत व बहुसंख्य नांबुद्री मुलींना जन्मभर कुंवार राहावे लागते; कारण त्यांना संबंधमसारखे विवाहबाह्य बंधन ठेवण्याची रूढीने सक्त मनाई आहे. वर सांगितल्याप्रमाणे हल्ली नांबुद्यांचे धाकटे मुलगे शिकून डॉक्टरी| वकिलीसारखे स्वतंत्र धंदे करू लागले आहेत व आपल्याच जातीतील | ब्राह्मण मुलींशी लग्ने करण्याची इच्छा असूनही नांबुद्री मुलींचे बाप अशा मुलाशी आपल्या मुलीचे लग्न लावीत नाहीत, तर त्यांना कुवार ठेवण पत्करतात! ह्या समाजातील लग्नाच्या वयाच्या, संततीचे उत्पादन करण्यास समर्थ अशा, ब-याच मुलींना कुवार राहावे लागत असल्यामुळे समाजाची लोकसंख्या हळूहळू घटत चालली आहे. त्यांतच जर सक्तीच एकपत्नित्व पुरुषांवर लादले तर सबंध समाज नष्ट होईल. नव्या दुरुस्त कायद्यात वारस कोण असावे ह्याबद्दल जो कायदा केला आहे तो नाबुद्यान लागू नाही, असे स्पष्ट नमूद केले आहे. तेव्हा सबंध नांबुद्री समाजाची पाहणी करून त्यातील पुढारलेल्या समाजसुधारकांची आकांक्षा काय आहे हे न पाहता वारसाहक्कांत व त्यांशी संलग्न अशा विवाहपद्धतीत काही बदल