पान:आमची संस्कृती.pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१०८ / आमची संस्कृती

मार्गाचा परिस्थितीप्रमाणे तिला अवलंब करता यावा. तो मार्ग फक्त घटस्फोटाचाच असावा असा हट्ट का? सवतीच्या सान्निध्याने स्त्रिया किती द:खी होतात हा विचार मी करीत नाही असा आरोप माझ्यावर केला आहे, असे मला वाटते. नव्या हिंदु कायद्यात जर घटस्फोटाची वगैरे व्यवस्था केली तर स्त्रीला १. नव-यापासून विभक्त होणे २. नव-यापासून काडीमोड मिळणे किंवा ३. सवतीबरोबर नव्या कुटुंबात राहणे असे तीन मार्ग राहतात व त्यांपैकी कोणत्याही एकाचा स्वीकार तिला करता येईल. तिला सक्तीने हल्ली राहावे लागते तसे सवतीबरोबर राहावे लागणार नाही. अशी परिस्थिती झाली म्हणजे एकपत्नित्वाची सक्ती बव्हंशी निरर्थक व काही थोड्या प्रसंगी अन्याय्य होईल. थोडी उदाहरणे खाली देत आहे. ह्यांपैकी कोणतेही उदाहरण काल्पनिक नाही.
 हल्ली हिंदुस्थानात धर्म बदलणे कपडे बदलण्यापेक्षाही सोपे झाले आहे. एका ख्रिश्चन बाईने तिच्या प्रियकराची पहिली पत्नी जिवंत होती म्हणून धर्मत्याग करून हिंदू होऊन त्या माणसाशी लग्न केले. हिंदू कायदा बदलला तरी बहुपत्नित्व असलेल्या पुष्कळ जमाती हिंदुस्थानात राहतीलच व तितकीच वेळ आली तर घटस्फोट मिळत नाही म्हणून धर्मांतर करून लोकांना आपली दुस-या लग्नाची हौस भागवता येईल व असे झाल्यास प्रथम पत्नीच्या पोटगीवर व वारसा हक्कावरही गदा येण्याचा संभव आहे.
 एका बाईस मूल होणे शक्य नाही म्हणून तिने आपल्या नव-याला दुसरे लग्न करावयास लावले. आता ती सवतीच्या मुलांचा मोठ्या प्रेमान सांभाळ करीत आहे. कायद्याचे एकपत्नीत्व असते तर त्या बाईला घटस्फोट तरी घ्यावा लागता किंवा दत्तक तरी घ्यावा लागता. ह्यापक काहीच न करता हा तिसरा मार्ग स्त्रीला मोकळा असावा असे माझे मत आहे. दुस-याचे मूल घेऊन पोसत बसण्यापेक्षा स्वत:चे, नाही तर निदान नव-याचे, स्वत:च्या घरी ज्याचा जन्म झाला आहे असे मूल जवळ . काही स्त्रियांना दत्तक घेण्यापेक्षा पसंत पडेल व कायद्याने त्यांना तस करण्यास आडकाठी करू नये.
 एका लग्नात असे आढळून आले की, एका बाईशी स्त्री म्हणून संबंध ठेवणे शक्य नाही. नव-याने दुसरी बायको केली व दोन्ही सवती एक घरी नांदत आहेत. घटस्फोट मागून बाईचे शारीरिक वैगुण्य चव्हाट्यावर