पान:आमची संस्कृती.pdf/107

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


१०० / आमची संस्कृती

सर्वात श्रीमंत व सर्वांत गरीब ह्यांच्या संपत्तीचे प्रमाण १०:१, ८:१, ५:१, ४:१ असे राहील, जेथे संपत्तीचा संचय होणार नाही अशा त-हेचे कर असतात व जेथे सर्वात श्रीमंतीचा दर्जा गाठण्याची संधी सगळ्यांना मिळते त्या समाजात आर्थिक विषमता नाही असे म्हणण्यास हरकत नाही. काही उदाहरणे दिली म्हणजे माझे म्हणणे स्पष्ट कळेल. पहिल्या महायुद्धापूर्वी ग्रेट ब्रिटनमध्ये आर्थिकदृष्ट्या करोडोपतीपासून अगदी गरिबांपर्यंत साधारणपणे पाच वर्ग होते. दुस-या महायुद्धानंतर सर्वात वरचा व सर्वांत खालचा वर्ग हे दोन जवळजवळ नष्ट झाले होते, व सांपत्तिकदृष्ट्या तीनच वर्ग राहिले होते. मृत्यूनंतर वारसाला मिळावयाच्या संपत्तीवर बसवलेला जबरदस्त कर व मजूर चळवळीमुळे मजुरांच्या पगारात झालेली वाढ ह्यामुळे ही गोष्ट घडून आली व समाजातील सांपत्तिक विषमता ब-याच अंशी कमी झाली; म्हातारपणाचे सार्वत्रिक पेन्शन, सरकारी औषधोपचार, तेरा वर्षांपर्यंत फुकट शिक्षण, गरिबांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या व बेकारांना मदत वगैरे गोष्टींमुळे उरलेली विषमताही हळूहळू कमी होत आहे. आज कोळशाच्या खाणीत काम करणा-या मजुराचा पगार लंडन युनिव्हर्सिटीच्या लेक्चररइतका जवळवळ आहे. अमेरिकेत सर्वांत मोठ्या प्राध्यापकाला वर्षाचे ९ ते १० हजार डॉलर पगार असला तर त्याच कॉलेजातील शिपायाला २ हजार डॉलर पगार असतो. पगाराचे हेच मान जपानमध्येही दिसून येते. पगारदार लोकांत सर्वांत जास्त व सर्वांत कमी पगारात ५:१ पेक्षा जास्त तफावत असू नये. धंद्यातील लोक जास्त पैसा कमावतात. कारखानदार व गरिबांच्या कमाईचे प्रमाण १०:१ किंवा त्यापेक्षाही व्यस्त असते. पण ह्या कमाईवर जबर कर असतात व वारसाकडे जातांना मोठा लचका तुटतो. ह्यामुळे बरेच श्रीमंत लोक जिवंतपणीच ऋग्णालये, शाळा-कॉलेजे वगैरेंना मुक्त हस्ताने मदत करतात. ह्याशिवाय ह्या सर्व देशांतून औषधोपचार ब-याच अंशात फुकट असतो व शिक्षणयम शिक्षण नुसते प्रायमरी नव्हे- फुकट किंवा अतिशय स्वस्त असते. आर्थिक विषमता जाणवते ती आपल्या माणसाच्या आजारात पैसा नसला म्हणजे, म्हातारपणी हातपाय थकले म्हणजे, मुलांना शाळेत घालायला पैसे नसले म्हणजे. आपण लहान घरात राहतो, शेजा-याचा बंगला आहे. याबद्दल वैषम्य वाटत नाही, पण वरील गोष्टींनी, माणूस म्हणून जगता.