पान:आमची संस्कृती.pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

९६ / आमची संस्कृती

निराळेच. मीही ह्या अशाच पाहुण्यांपैकी, त्यांतून कोणत्याही त-हेचे सामाजिक कार्य प्रत्यक्ष अंग मोडून न केलेली. तेव्हा माझे भाषण वरील त-हेच्या पाहुण्यांसारखे किंबहुना त्याहूनही कमी दर्जाचे झाले तर नवल नाही व मी त्याबद्दल आपणा सर्वांची क्षमा मागून ठेवते.
 प्रत्यक्ष समाजकार्य करणा-या धुरीणांना मी काय सांगणार असा विचार करताना माझ्या मनात आले की, कार्य काय करावे हे अंगी पात्रता नसताना सांगण्याचा अतिक्रम न करता समाजधारणेला कुठच्या गोष्टीची आवश्यकता आहे हे सांगितले तर कार्यकर्त्यांना त्याचा कदाचित उपयोग होईल. रणक्षेत्रावर शिपाई लढत असतात, ते आपल्या कामांत कसूर करीत नाहीत; पण त्यांना कल्पना नसते. प्रत्यक्ष लढाईत न उतरता लांब बसून, नकाशा पुढे ठेवून, शत्रूच्या हालचाली, डोंगर, नद्या, नाले, प्रदेशाचा उंचसखलपणा, वगैरे सर्व ध्यानात धरून कुठून व कशी चढाई करावी, आपल्या फळीत कच्चेपणा कुठे आहे, संरक्षण हालचाली कशा कराव्या वगैरे गोष्टी पुष्कळदा लांब असणा-या माणसाला सांगता येतात. तसाच काहीसा माझा आजचा प्रयत्न आहे.
 समाजातील घटकांचे परस्परावलंबन, समाजिक समता म्हणजे काय व हल्लीच्या काळी आपली स्थिती सुधारण्यास आपणास काय करता येईल ह्याविषयी काही थोड्या गोष्टी मी आपणांशी बोलायचे योजले आहे.

 समाजातील घटकांचे परस्परावलंबित्व
 अगदी लहानपणी आपण पोट व इतर अवयव ह्याबद्दल गोष्ट वाचला असेल. त्यात सर्व अवयव न भांडता एकमेकांशी सहकार्याने राहिले तरच शरीरपोषण व शरीर-व्यापार शक्य आहेत, एरवी नाही व त्याचप्रमाण मामाजाचे निरनिराळे घटक एकमेकांशी सहकार्याने राहिले पाहिजेत असा सारांश दिला आहे. ही रूपक-कथा व सारांश फार जुना आहे. ऐकला म्हणजे सर्व त्याला माना डोलावतात. पण त्याचा अर्थ नीट अंत:करणाला जाऊन भिडत नाही. समाजाचे सर्व घटक सुदृढ, मजबूत असले तरच बहकार्य नीट होऊ शकते. एखादा घटक जरी दुर्बल असला तरी सर्व समाज दबळा होतो हे आपल्या चटदिशी ध्यानात येत नाही. समाजात काही थोडे लोक सुशिक्षित व विद्वान असले तर त्यांच्या ज्ञानाच्या प्रभेने बहसंख्य