पान:आमची संस्कृती.pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / ९५









 ८. क-हाड अधिवेशनाचे अध्यक्षीय भाषण



 अध्यक्षबाईसाहेब व बंधु-भगिनींनो,
 तुम्ही उत्तर सातारकरांनी मला येथे बोलावून माझा जो सन्मान केला आहे त्याबद्दल मी तुमची फार ऋणी आहे. कोणत्याही समारंभाला जाऊन भाषण करण्याचे माझ्या अतिशय जीवावर येते, ह्याचे कारण म्हणजे मी माणूसघाणी आहे असे नव्हे. इतरांच्या मानाने मी कामात बुडालेली असते व मला क्षणाचीही फुरसत नसते असेही नव्हे. पण अशा त-हेच्या व्यासपीठावरून बोलण्याचा माझा अधिकार नाही असे मला मनोमन वाटते व दुसरे कारण म्हणजे प्रत्येक कार्याला बाहेरचे माणूस बोलावण्याचा आजकालचा प्रघात मला पसंत नाही. एखादी शाळा म्हणा, संघ म्हणा, ह्याचे काय कार्य चालले आहे हे त्या त्या शाळांत किंवा प्रदेशात चांगले माहीत असते. बाहेरचा माणूस कार्याच्या कळकळीने यायला प्रवृत्त होतो असे नसून कोणत्या तरी व्यक्तीच्या आग्रहाला बळी पडून येतो. आमंत्रण स्वीकारले म्हणजे त्या संस्थेचा अहवाल चाळून त्याबद्दल चार शब्द आपल्या भाषणात सांगतो. ते चार शब्द अर्थातच मोठ्या गौरवाचे असणार; कारण पाहणचाराचा पहिला शिष्टाचार तरी पाहुण्याला पाळला पाहिजे. आणि इतर भाषणात सर्वसाधारण उपदेश केलेला असतो. कार्यकर्त्यांपैकी कित्येकांचा वेळ पाहुण्यांच्या सरबराईत फुकट जातो हे