पान:आमची संस्कृती.pdf/10

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / ३

 तो महत्त्वाचा फरक
 ह्या क्षुद्र जीवांच्या जीवनक्रमाकडे जरा दृष्टी टाकली तर त्यांच्या व मानवी संस्कारांच्या निर्मितीत मोठा फरक दिसून येईल. एका मधाच्या पोळ्यात मधमाशांच्या पिढ्यानपिढ्या जातात. पोळे वाढते किंवा कमी होते; पण प्रत्येक पिढीचा जीवनक्रम आखल्यासारखा असतो. हजारो पिढ्यांपूर्वीची मधमाशी, मुंगी, वाळवी व फुलपाखरे जो जीवनक्रम जगत होती, तोच जीवनक्रम आजही जगत आहेत. एक पिढी दुसरीस शिकवीत नाही- ज्ञानाचा साठा वाढत नाही, वस्तूंची निर्मितीही वाढत नाही. चिमणी, बाया, परत परत तसलेच घरटे बांधते, दर पिढी आपल्या पिलांना तेचतेच शिकवते, एका चाकोरीतून पिढ्यानपिढ्यांचा जीवनक्रम जात त्या बाहेर तो पडत नाही. कीटकांच्या व पशुपक्ष्यांच्या कृती ठरून गेल्यासारख्या आहेत. त्यांत बदल फारच थोड्या प्रमाणावर होतो.
 कीटकांच्या समाजरचना, सामाजिक भेद व कार्याची वाटणी ही त्यांच्या शरीररचनेवर अवलंबून असते. कामकरी मुंग्यांचे शरीर एक प्रकारचे असते, शिपाई मुंग्या नपुंसक व प्रजनन करण्यास असतात, तर राणी मुंगी म्हणजे अंडी साठवण्याचे, हालचाल करणे जवळजवळ अशक्य असलेले असे लडु पोते जणू असते. फुलपाखराचा मादी एका पानावर अंडी घालून मरून जाते. अंडी फुटून आळ्या बाहेर पडल्या म्हणजे त्या तेच पान खाऊ लागतात. खाऊन खाऊन लढू झाल्या, अंगातून सूत काढून स्वत:च्या अंगाभोवती कोश करतात. तो कोश तर आतून फुलपाखरू काही दिवसांनी बाहेर येते व आपल्या जोडीस शोधते; परत नव्याने अंड्यापासून सुरुवात होते. आयुष्यात ज्या क्रिया चालतात त्या शिक्षणाशिवाय, गुरुमुखाशिवाय चालतात.
 फलानुमेयाः प्रारंभाः संस्काराः प्राक्तना इव असे कालिदासाने रघुवंशातील राजाचे वर्णन केले आहे ह्या जीवजातींतील सर्व संस्कार प्राक्तन असतात. मागील जन्मावरून आलेले असतात; आणि सर्व प्रारंभ कशासाठी असतात हे कार्यमग्न व्यक्तीला माहीत नसते, पण ते फलानुमेय असतात. प्राक्तन संस्कार म्हणजे त्या त्या जातीला विशिष्ट अशी शरीररचना व त्या रचनेवर आधारलेली कार्यकुशलता. हिला 'प्राक्तन म्हटले; कारण ह्या दोन्ही गोष्टी बीजगुणांवर अवलंबून असतात. मुंगीचे