पान:आमची जात आणि माझें टिपण.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ८ ] आणि हिंदी वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध केल्या; पण त्यापासून कांहींच निष्पन्न झालें नाहीं, तदनंतर मी निरनिराळ्या गांवीं राहणाऱ्या जातीतील प्रमुख पुढा-यांस खाजगी- रीतीनें पत्र लिहून जातिसंबंधानें माहिती कळविण्याची तसदी घ्या अशी त्यांना विनंति केली; परंतु त्यांच्यापैकीं तर पुष्कळांकडून पत्र पावल्याचें उत्तरहि पाठविण्याची तसदी घेतली गेली नाहीं. उलट टीका करूं लागले, अर्थातच त्यांच्याकडून माहिती कितपत मिळणार, हे उघडच दिसत आहे. अशी सर्वप्रकारें निराशा उत्पन्न करणारी स्थिति अनुभवास आली; परंतु त्यांतल्यांत्यांत समाधान मानण्याजोगी गोष्ट झटली ह्मणजे ही आहे कीं, कांहीं सद्गृहस्थांनीं आपणांस माहिती नाहीं असे प्रांजलपणे कळवून आपला उद्योग अत्यंत स्तुत्य, प्रशंसनीय व अभिनंदनीय आहे; आणि या सत्कार्थी आपणांस पूर्ण यश मिळो, अशी आपली सदिच्छा प्रदर्शित करून मला मोठें प्रोत्साहन दिलें. अशा प्रकारचीं जातीच्या शुभेच्छु गृहस्थांकडून मला पत्रें आलीं आहेत, तीं जर सर्व छापलीं तर एक लहानसा ग्रंथच होणार आहे. यासाठी तीं कोठकोठून आलीं, आणि त्यांतील सारांश कळविला असतां आपल्या जातीच्या इतिहासाची किती मोठी जरूर आहे, ती चांगली दिसून येणार आहे. जयपुर, दिल्ली, लाहोर, अजमीर, जोधपूर, उदेपूर, व्यावर, आग्रा, बडनगर, इंदूर, ग्वाल्हेर, अलाहाबाद, नागपूर, अमरावती, जालना, औरंगाबाद, हैद्राबाद, कांग्रा, रतलाम, निमच, पुणे वगैरे ठिकाणच्या आमच्या ज्ञातींतील प्रमुख पुढाऱ्यांनी मला असे लिहून कळविले आहे कीं, “ जे स्तुतिपाठक असतात ते स्तुति करितात; आणि जे निंदक असतात ते निंदा करीत सुटतात; अशी जरी वास्तविक स्थिति आहे, तथापि सज्ज- नांचा धर्म असा आहे कीं, जें उत्तम आहे त्याचा स्वीकार करावा; आणि जें वाईट आहे त्याचा त्याग करावा. हे सर्वमान्य व अत्यंत ग्राह्य तत्त्व आहे. या न्यायानें स्तुति ह्रीं कांहीं प्रसंगी अयोग्य अशी ठरत नाहीं. आह्मी आपली जितकी स्तुति करावी तितकी थोडीच होणार आहे. जर प्रसंगानुसार आह्मांस एकमेकांस भेटण्याचा प्रसंग प्राप्त झाला तर निरनिराळ्या ठिकाणीं जातींची नांवें निरनिराळी सांगतात. आह्मी श्रेष्ठवर्णा- तील असून आह्मी कोण हें आधारयुक्त सांगण्यास आमच्याजवळ कोणत्याच प्रकारचें साधन नसल्यामुळे अन्य वर्णीय लोक आह्मांस खुशाल शूद्रवत् समजतात; आणि आह्मांसही ते आमच्या अज्ञानामुळे निमूटपणे ऐकून घ्यावे लाग आहे. ही स्थिति दूर करण्यास आपल्या जातीचा खरा इतिहास प्रसिद्ध झाला पाहिजे. काम आपण स्वीकारले आहे, तें परम स्तुत्य आणि अत्यंत प्रशंसनीय आहे. या आपल्या अपुर्व धाडसाची जितकी प्रशंसा करावी तितकी थोडीच होणार आहे. आपण या जातींत जन्मास येऊन आपले जातबंधु, ज्यांना आपल्या जातीची खरी ओळख नाहीं आणि जे त्यासंबंधानें अज्ञानांधकारामध्ये पडले आहेत, त्यांना आपल्या जातीची खरी