पान:आमची जात आणि माझें टिपण.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परमपूज्य, परमवंद्य व परमप्रिय मज्ज्ञातिबांधवांस अल्पसेवा समर्पण. श्लोक ( शार्दूलविक्रीडित. ) झालों काय कसा असे कवण मी कोठूनि आलों कधीं । ह्याचें उत्तर सांगण्यांत गढले लक्षानुलक्षावधी | जातीही तुमची असे कवण हो। त्वद्धर्म तो कोणता । खाली मान करी उगाच बसुनी लज्जेमुळे नेणता ॥ १ ॥ श्लोक ( स्रग्धरा. ) इंग्लदाचे क्रमानें भरभर कतिथी पूर्विचे सर्व राजे । ठावे नाहीत आतां नविन पिढिस ह्या आपुले बाप आजे ॥ मज्जाती धर्म मोठा म्हणति किति आम्ही पाळितों एकनिष्ठ । बाकीचे लोक चित्तीं सकल समजती हीन जाती कनिष्ठ ॥ २॥ अज्ञानें स्वाभिमानें बरळत सुटती काय उच्चस्वरानें । स्वत्त्वाच्या आढ्यतेनें फुकटच फुगती द्वेष की मत्सरानें ॥ ऐसा जो का चुकीचा दिसत समज तो व्हावया दूर जाण । वंशाची आपणाला उचित मिळविणें शृंखळा सप्रमाण ॥३॥ होतों प्राचीन कालीं कवण जन अम्ही जाहलों कोण अंशीं । गोत्राच्या लौकिकाचा पुरुष निपजला आमुच्या कोण वंशीं ॥ स्वशाती धर्म कर्मे घडति कसकशी देवता कोण इष्ट । ही सारी माहिती मी बरिच मिळविली सोसुनि फार कष्ट ॥४॥ श्लोक ( शार्दूलविक्रीडित. ) ऐसा हा इतिहास शक्य तितुका शोधोनि केला नवा । प्रेमें अर्पितसे नमूनि विनयें मज्ज्ञातिच्या बांधवां ॥ सेवा गोड करोनि घ्या सहृदयें अल्प प्रमादा सहा । प्रार्थी जोडुनि हात मी गणपती स्वशातिचा दास हा ॥ ५ ॥