पान:आमची जात आणि माझें टिपण.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ १० ] इतके थोर कार्य कोणाचीहि कोणत्याहि प्रकारची मदत नसतां हाती घेतले आहे, तें निर्विघ्नपणें सिद्धीस जावो. आपणास पूर्ण यश प्राप्त होवो. श्रीरामदासानें झटले आहे कीं, मरावें परी कीर्तिरूपें उरावें, त्याप्रमाणें आपली या ग्रंथरूपानें Literature ( वाङ्मय ) मध्ये कीर्ति अमर राहणार आहे. आपण जर आपला इतिहास हिंदीत तयार केला असता तर तो सर्वोपयोगी झाला असता. आणखी आमची आपणाजवळ अशी आग्रहपूर्वक सूचना आहे कीं, जे लोक गरीब स्थितींतून आपल्या उद्योगाच्या बलावर पुढे आलेले असतात त्यांचें चरित्र होतकरू मंडळीस उपदेश घेण्यासारखें असतें, असा सर्वत्र अनुभव आहे. त्याप्रमाणे आपणही गरीब स्थितींतून स्वपराक्रमानें पुढे आलेले आहांत. आपले सचित्र चरित्र जरी युरोपांतील अनेक ठिकाणच्या सुप्रसिद्ध मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे; तथापि निव्वळ मराठी वाचकांस त्याचा उपयोग होत नाहीं; यासाठी मराठीत लिहिल्यास ते आपल्या जातबंधूंस वाचावयास मिळेल. आपल्या जातीचा इतिहासाबरोबर आपले चरित्र प्रसिद्ध केल्यास तेही विशेष उपयुक्त, बोधपर व अनुकरणीय होणार आहे. या आमच्या नम्र पण प्रेमळ सूच- नेचा अनादर आपणाकडून होऊं नये अशी विनंति आहे. " अशा प्रकारची स्तुतीनें ओतप्रोत भरलेलीं पत्र आलीं. माझ्या संबंधानें त्यांची इतकी प्रेम व आदरबुद्धि झाली आहे, तीस मी मुळींच पात्र नाहीं; असें मी प्रांजलपणें येथें कबूल करतो; आणि मी त्यांच्या थोरपणाबद्दल त्यांचें नम्रतापूर्वक उपकार मानतों. जयपूर, अजमीर, निमच, इंदूर, ग्वालेर, आग्रा, दिल्ली, लखनौ, बनारस, अलाहाबाद वगैरे दूरदूरच्या भागांतील लोकांना जातीच्या इतिहासासंबंधानें इतका आनंद व्हावा आणि त्यांनी तो केव्हां बाहेर पडेल याची चातकाप्रमाणे मार्गप्रतिक्षा करीत बसावें. परंतु येथील अगदीं नजीक राहाणाया जातभाईकडून जातीसंबंधी माहिती मिळण्यासंबंधानें कोणत्याच प्रकारची मदत मिळूं नये, ही किती दिलगिरीची गोष्ट आहे बरें ? आणि त्याबद्दल मला येथें दिलगिरी प्रदर्शित केल्यावांचून राहवत नाहीं. सन १९०० सालापासून मी स्वतः शोध करण्यास सुरवात केली; आणि मनुष्य ठेवून ग्रंथ, पुराण, दंतकथा, इतिहास, शिला, सनदा, जुने लेख वगैरे शोधण्याचे काम सुरू केलें; त्यांतून जे आधार मिळत गेले तें टिपून ठेवूं लागलो. ज्या ज्या गांवीं जातीचा विशेष भरणा आहे त्या त्या गांवीं पत्र पाठवून शोध मागविला; परंतु बहुतेकांकडून साधार माहिती मिळाली नाहीं. मी राजेश्री तात्यासाहेब गुप्ते वकील यांना विचारलें कीं, "माझ्या जवळ बसून मी जें सांगेन ते शुद्ध व व्यवस्थेशीर लिहील असा मला आपल्या ओळखीचा कोणी इतिहास लेखक असल्यास या." त्यांनी मला भंडारी ज्ञातिचा इतिहासलेखक रा. सखाराम हरि गोलतकर राहणार वसई जिल्हा ठाणे यांची