पान:आमची जात आणि माझें टिपण.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[९] ओळख करून देऊन त्यांचा अज्ञानांधकार घालवून त्यांना जातीचा खऱ्या ज्ञानाचा प्रकाश प्राप्त करून देणार आहांत, ही जी आपण ज्ञातीची केवळ निरपेक्षबुद्धीनें तन, मन, धनपूर्वक सेवा करण्याचा संकल्प केला आहे, तिला सेवा हें साधारण नांव शोभत नाहीं; पण ज्ञातीचा उद्धार केला असे ह्मणणे हेंच योग्य नांव शोभणार आहे. आपल्या ज्ञातींत पुष्कळ दानशूर पुरुष होऊन गेले; त्यांनी हजारों रुपये खर्च करून नवीन देवालयें बांधलीं, जुनाट देवालयांचा जिर्णोद्धार केला, सभामंडप तलाव, धर्मशाळा, विहिरी वगैरे बांधून आपली औदार्यवुद्धी प्रगट केली आणि आपले चिरकालिक स्मारक करून ठेवले आहे. त्यामुळे ते बहुजनाच्या स्तुतीस पात्र झाले आहेत, आणखी, ते जातीस भूषणावहही झाले आहेत. आपण जातीचा इति- हास लिहिण्याचें मोठ्या खर्चाचें, बुद्धीचें आणि ज्ञानाचें काम स्वीकारले आहे, ते वरील कामापेक्षांहि अधिक उपयुक्त व महत्वाचे ठरल्यावांचून राहाणार नाहीं; आणि आपणांस ज्ञातीचा उद्धार केल्याचे श्रेय प्राप्त होणार आहे. आपल्या या परोपकाराच्या कृतीबद्दल आह्मी तर आपले ऋणी आहोतच; परंतु आपली भावी पिढी ही देखील ऋणी होणार आहे; आणि तीही आपली ऋणी आहे, असे कृतज्ञबुद्धिपूर्वक कबूल केल्यावांचून कदापि राहवणार नाहीं. या इतिहासांतील अपूर्व शोधाची वास्तविक किंमत व योग्यता सध्याच्या पिढीस जरी कळणार नाहीं, किंवा कळत असूनही न कळल्या सारखे दाखवितील तथापि पुढील पिढी या अपूर्व शोधाची खरी खरी योग्यता जाणल्यावांचून राहणार नाहीं. इतकेंच नाहीं, तर हा इतिहास इतर जातींसही पुष्कळ उपयोगी पडण्याचा संभव आहे. आपल्या या पुस्तकास इति- हास ह्मणण्यापेक्षां आपला हा जातीचा परमपूज्य ग्रंथ समजला जाईल. आज आमच्या ज्ञातीची स्थिति डबक्यांतील किंवा विहिरीतील बेडकाप्रमाणे झाली आहे; त्या बेडकाला तें डबके किंवा विहिर इतकेच कायतें जग आहे असे वाटत असतें; कारण त्याला सागराचे दर्शन झालेले नसतें; तद्वतच आपल्या जातीचा किती विस्तार झाला आहे, आणि या भरतखंडांत आपली किती मोठी जात पसरली आहे याची बहुजनसमाजाला माहिती नसल्यामुळे जी इकडे थोडी जात आपल्या दृष्टीस पडते तित- कीच कायती आपली जात असा त्यांचा ग्रह होणे अगदीं स्वाभाविक आहे; परंतु तुमच्या इतिहासाच्या द्वारे आपल्या जातीचें विराट स्वरूप प्रगट होणार आहे, ह्मणजे आपली जात कोठपर्यंत पसरली आहे, हे कळण्यास उत्तम साधन व मार्ग होणार आहे आणि एकमेकांबरोबर दळणवळण ठेवण्याचा मार्गही सुलभ करून दिल्यासारखें होणार आहे. आपण स्वतः आपल्या जातीचा इतिहास लिहीत आहांत, हें ऐकून आह्मांस जो आनंद झाला आहे त्याचें आह्मांला वर्णन करतां येत नाहीं, इतका तो थोर व अव- र्णनीय आहे. श्रीहरी आपणास उदंड आयुष्य देवो; आणि आपण या उतार वयामध्यें