पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रार्थनेचा सुनियोजित वापर धर्म, शिक्षण, प्रसारकार्य, राष्ट्र उभारणी, चळवळ, विचार प्रचार, पंथ प्रसार इत्यादीमध्ये सर्रास केला गेला आहे. संत, महात्मे, नेते यांनीही आपल्या उद्देश प्राप्तीसाठी प्रार्थनेचा उपयोग केला नि काही अंशी तो झालाही. अगदी राजकारणातही त्याचा उपयोग झाल्याचे दिसून येते. पण ते श्रेय प्रार्थना शक्तीपेक्षा लोकात असलेल्या पारंपरिक श्रद्धा नि प्रार्थना शक्तीपेक्षा लोकांत असलेल्या पारंपरिक श्रद्धा नि आचरणास द्यावे लागेल. झुडीचं मानसशास्त्र अशा कर्मकांड्चा सर्रास वापर करतं व ईप्सित साध्य करतं. प्रार्थनेचा असा वापर लांब पल्ल्याच्या षड्यंत्राचाच भाग असतो. प्रार्थनेच्या सुनियोजित वापराच्या तंत्रांनी सारे धर्मग्रंथ भरले आहेत. त्याचा सुनियोजित वापर सर्व काळात संत, नेते, महात्मे, बाबा, भगवान म्हणविणाच्या सर्वानी केला आहे. वापरात महात्मा गांधी, आचार्य विनोबांनी जी दृष्टी व तंत्र वापरले तेच भगवान रजनीशांनी. एकाला बरोबर नि दुस-याला चूक म्हणणे तुमच्या सापेक्षी नि साक्षेपी विचारांवरच ठरते ना? खलिल जिब्राननी प्रॉफेटमध्ये, महात्मा गांधींनी आपल्या सायंप्रार्थनेतून, विनोबांनी गीता प्रवचनातून, भगवान रजनीशांनी आपल्या समग्र लेखनातून ते अनेकदा स्पष्ट केलंय. ही सारी बाबागिरीच होय.
 वरील विवेचन व विश्लेषण हेच प्रार्थनेबद्दल माझं मत नि अनुभव. माझ्याकडे ‘तुकाराम गाथा’, ‘नामदेव गाथा', 'ज्ञानेश्वर', 'दासबोध', 'बायबल', ‘कुराण', 'कबीरबानी’, ‘गुरूग्रंथ साहब', 'रामचरितमानस', 'सूरसागर', मीरा पदावली', 'भ्रमरगीत सार’, ‘विनय पत्रिका', 'प्रार्थना समाजाचा', ‘भजन संग्रह', ‘प्रॉफेट' आहे. हे सारे प्रार्थना संग्रहच नाहीत का? ते माझ्या संग्रहासाठी आहेत. तुम्हास संदर्भासाठी जरूर देता येतील.
 ‘ब्लू साँग्ज'बद्दल मला काही माहीत नाही. त्यांचे वाचनही नाही. संग्रह तर नाहीच. आफ्रिकेच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे महत्त्व जाणतो इतकेच.

 मी ज्या संस्थेत कार्य केले तिथे ते कर्मकांड, संस्कार, शिक्षण साधन म्हणून वापरले जायचे. त्याचा उपयोग अंतर्मुख वृत्ती असलेल्यांच्या बाबतीत दिसून आला. अन्यथा ही ती मंडळी विवेक विकासानंतर सन्मार्गी, सदाचारी झाली असती असे वाटते. अपराध्यात उपरती जन्मते ती प्रार्थनेपेक्षा पश्चात्तापाने अंतर्विकास, आत्मभान असतो. प्रार्थना तशीच हवी.

आकाश संवाद/९८