पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रक्रियेसारखा नेहमी पसरणारा आहे. आपले समाज जीवन हे अधिक उदार व व्यापक व्हावं असं जर आपणास मनस्वी वाटत असेल तर त्याची सुरवात स्वत:पासून व्हायला हवी. सदाचार स्वत:पासून सुरू व्हायला हवा. समाज जीवन निष्काम कर्मयोगानी फुलायला हवे असे जर आपणास वाटत असेल तर त्याची सुरवात स्वत:पासून नको का व्हायला? तसे झाले तर समाज जीवनास लागलेले मतलबाचे ग्रहण क्षणार्धात सुटेल व सर्वत्र मांगल्याचा प्रकाश पसरेल. गीतेत वर्णिलेल्या निष्काम कर्मयोगाची आज आपणास खरी गरज आहे. स्वार्थाने घेरलेले समाज जीवन त्याशिवाय ख-या अर्थाने मुक्त होणार नाही. गीतेतील निष्काम कर्मयोगाला समाज जीवनात पर्याय असत नाही, याची पक्की खुणगाठ आपण बांधायला हवी.

आकाश संवाद/९२