पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निष्काम कर्मयोग

 “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचान' हे गीतेतील वचन सर्वाच्या परिचयाचे आहे. या वचनांद्वारे गीतेने आपणास निष्काम कर्मयोगाची शिकवण दिली आहे. माणसाने आपले प्रत्येक काम हे कर्तव्य म्हणून करायला हवे. फळाची अपेक्षा न धरता कार्य करत रहाण्याच्या वृत्तीलाच निष्काम कर्मयोग म्हणतात. निष्काम कर्मयोगाबद्दल विवेचन करताना विनोबांनी आपल्या ‘‘गीता प्रवचन"मध्ये म्हटले आहे की कर्तव्य बुद्धी ही आक्रोडाचे झाड लावण्यासारखी असायला हवी. आक्रोडाचे झाड लावणारा हा कधी आपल्याला आक्रोड खायला मिळतील म्हणून झाड लावत नसतो. आक्रोडाचे झाड लावल्यानंतर फळ खायलाच मुळी पंचवीस वर्षे लागत असतात. लावणाच्याला क्वचितच फळ मिळते. पण आपले पूर्वज पहा. त्यांनी पुढच्या पिढीला अक्रोड मिळावे म्हणून ही झाडे लावली.
 व्यक्तिगत वा सामाजिक जीवनात आपली भूमिका ही अशीच असायला हवी. प्रत्येक वेळी जर आपण कमीशनचाच विचार करायला लागलो तर आपले मीशन पूर्ण कसे होणार? आपल्या जीवनाचे छोटे वर्तुळ रूंद करून परिघाबाहेर आपण डोकवायला शिकले पाहिजे. मी आणि माझे घर हा संकुचित विचार सोडून देऊन त्याच पलीकडचे ऊंच जग न्हाहाळायला आपण शिकले पाहिजे. जगणे या कल्पनेत दुस-यासाठी जगणे अभिप्रेत असते ते आपण सोणीस्करपणे विसरत चाललो आहोत.

 आज आपले सारे सामाजिक जीवन अरूंद होत आहे. प्रत्येक गोष्टीत मला या पासून काय मिळणार असा हिशोब लावायला लागलो तर सामाजिक कार्य रहाणारच नाही. म.फुले, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाह महाराजांसारखी माणसे मोठी झाली ती निष्काम कर्मयोगामुळेच. महात्मा फुल्यांनी आपल्या घरचा हौद हरिजनांना खुला केला पण परिणती राष्ट्रातली सर्व जलाशये सर्वाना खुली होण्यात झाली. निष्काम कर्मयोगाचा परिणाम हा अणू विभाजनाच्या

आकाश संवाद/९१