पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आदराची भावना बाळगत होते. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वतींच्या विषयी त्यांची भावना काहीशी अशीच होती. जेव्हा ते पुण्यात आले तेव्हा त्यांनी मोठी मिरवणूक काढून त्यांचे स्वागत केले. अशा प्रकारच्या स्वागतासाठी रूढीवादी लोकांचा विरोध होता. त्यावरून ते उदारमतवादी होते याचाच परिचय मिळतो. 'गाढवाचं प्रदर्शन' असं म्हणून रूढीवादी लोकांनी त्यांना वेड्यात काढलं, पण ते जरासुद्धा विचलित झाले नाहीत. आर्य समाजाच्या प्रगतीशील तत्त्वांचा प्रचार करून समाजात नवजागरण आणण्यासाठी त्यांनी हा स्वागत समारंभ आयोजित केला होता.
 सन १८७६ पासून १८८२ पर्यंतच्या कालावधीत ते पुणे नगरपरिषदेचे नगरसेवक होते. नगरपरिषद म्हणजे सुधारणेचे प्रभावी साधन आहे असे ते मानत होते. आणि आपल्या या विचारामुळेच त्यांनी या नियुक्तीचा स्वीकार केला होता. दलितांच्या वस्तीत नागरी सोयी उपलब्ध होण्यासाठी त्यांनी मनापासून खूप प्रयत्न केला. त्या वेळी नगर पालिकेच्या निधीतील खूप मोठा वाटा इंग्रज अधिका-यांच्या समारंभावर खर्च होत होता. महात्मा फुल्यांनी अशा प्रथेचा विरोध करून आणि नगरपालिकेला आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली.

 महात्मा फुले समाजात मूलभूत परिवर्तन आणू पाहात होते. एकोणिसाव्या शतकातील समाज धर्मावर विश्वास ठेवणारा होता. जाती-धर्माचे नियम कडक होते. रीतीरिवाजाचे खूप प्रस्थ होते. समाजात मूर्तिपूजेला महत्त्वाचं स्थान होतं. ब्राह्मणांच्या इशा-यावर पौर्णिमा आणि अमावस्या ठरत होती. कर्मकांडाचं पालन करणं ही पद्धतच होती. संपूर्ण समाज त-हेत-हेच्या अंधविश्वासाने व्यापला होता. धर्म आणि ब्राह्मणांच्या बंधनात गुंतून गुलाम बनलेल्या अशा या अशिक्षित लोकांना महात्मा फुले मुक्त करू पाहात होते. हाच हेतू बाळगून त्यांनी सन १८७३ मध्ये ‘सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या अगोदर आपल्या येथे आर्य समाज, प्रार्थना समाजासारख्या प्रगतीशील संगठनाची स्थापना केली. या अगोदर आपल्या येथे आर्य समाज, प्रार्थना समाजासारख्या प्रगतीशील संगठनाची स्थापना झाली होती. देवाच्या आणि भक्तांमध्ये पंडित, पुरोहितांची आवश्यकता नसते असे ते मानीत होते. तत्कालीन पंडित-पुजारी अडाणी लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा उठवत आहेत, हे बघून महात्मा फुल्यांनी पूजा पाठ, विवाह इत्यादीच्या सोप्या-सुलभ उपचार पद्धतीचे समर्थन केलं. त्या वेळी संस्कृत ही पूजापाठाची भाषा होती. तिच्याऐवजी त्यांनी बोलीभाषेचाच उपयोग करून ब्राह्मणांशिवाय विधीचे अनेक उपाय सांगितले. सत्यशोधक समाजाद्वारे एकीकडे त्यांनी धर्मश्रद्ध अडाणी आणि

आकाश संवाद/५७