पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महात्मा जोतिबा फुले : जीवन-कार्य

 महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन म्हणजे नेता आणि महात्म्यांच्या कार्याचे पुनरावलोकन करण्याचा दिवस. महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने जीवनकार्याचे विहंगमावलोकन करणे निश्चित प्रेरक ठरेल.
 एकोणिसावे शतक सुधारणा आणि जागृती घेऊन आले. या काळात आपल्या देशात धर्म, जात, रूढी, परंपरा, शिक्षण इत्यादी बाबतीत जी जागृती झाली ती क्वचितच कुठल्या काळात झाली असेल. महाराष्ट्राच्या संदर्भातच जर विचार केला तर हा काळ सुधारकांचाच काळ सिद्ध होतो. या शतकात महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारख्या कितीतरी समाजसुधारकांनी आपल्या क्रांतिकारी आणि आक्रमक बनविण्याचे श्रेय महात्मा फुल्यांनाही दिले पाहिजे. या काळातील इतर सुधारकांनी एका विशिष्ट मर्यादित क्षेत्रातच सुधारणा केल्या. पण महात्मा फुल्यांनी स्त्री शिक्षण, बाल विवाह, पुनर्विवाह, केशवपन, स्पृश्य-अस्पृश्य, धर्मांधता इत्यादी विभिन्न प्रश्नांच्या संदर्भात व्याख्यान, लेखन, जनजागृती त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कृतिशील उपक्रमांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला.

 महात्मा फुल्यांनी १९४८ साली आपल्या सामाजिक कार्याचा प्रारंभ केला. आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते सामाजिक कार्याशी चिकटून राहिले. आपण त्यांच्या जीवनकार्याला दोन भागात विभाजित करू शकतो. सन १८४८ पासून १८६५ पर्यंत त्यांनी स्त्रियांच्या आणि दलितांच्या संदर्भात विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या सामाजिक कार्याचा पूर्वार्ध हा शैक्षणिक कार्याचा काळ होता. उत्तरार्धात सन १८६५ पासून १८९० पर्यंत त्यांनी

आकाश संवाद/५४