पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 थोड्याच दिवसांनी तो बरा झाला. पण आता इंग्रजांनी त्याच्यावर कोर्टमार्शल करण्यास सुरुवात केली. विचारपूस झाली. साक्षीदार सादर केले गेले. आरोप लावले गेले. त्याच्याकडून जबाब मिळविण्यासाठी वेगवेगळे उपाय केले गेले, पण त्याने हु का चू केले नाही. त्याने एकच पालुपद लावले होते, “हा माझा स्वतःचाच निर्णय होता! हे ना कटकारस्थान आहे ना अन्य काही! माझ्या देशाला आणि मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी उचललेले हे निर्णायक पाऊल आहे आणि याचा मला जरासुद्धा पश्चात्ताप झालेला नाही." नंतर राजद्रोह, बंड, हत्यांच्या आरोपाखाली त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. ८ वाजता एका सरोवराकाठी बनविल्या गेलेल्या वधस्तंभावर त्याला फाशी दिली गेली. मंगल पांडे हुतात्मा झाला. स्वातंत्र्याची मंगलज्योत पेटली गेली.
 क्रांतिकारी मंगल पांडेच्या बलिदानाने या पिढीत स्वतंत्र्याचा मूलमंत्र जागृत झाला. त्याच्या बलिदानानंतर कितीतरी देशप्रेमी, शिपाई, सैनिक हुतात्मे झाले. तेव्हापासून या देशातील प्रत्येक आई आपल्या मुलांना मंगल पांडेच्या बलिदानाची अमर कहाणी ऐकवू लागली. फासावर लटकणाच्या मंगल पांडेला बघून सगळ्या हिंदुस्थानी शिपायांनी इंग्रजांविरुद्ध मुठी आवळल्या. सामूहिक बंडाची परंपरा सुरू झाली. देशातील छोट्या-मोठ्या राजा, महाराजांनी संघटित होऊन इंग्रजांचा बदला घेण्याची शपथ घेतली. बराकपूर छावणीत तरी मंगल पांडेची प्रत्येक वस्तू अमर झाली. त्याच्या राहिलेल्या वस्तू आता पूजेच्या योग्य झाल्या. प्रत्येक विद्रोही स्वतःला मंगल पांडे बनविण्याचे स्वप्न बघू लागला. या बलिदानानंतर झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, शहीद भगतसिंहसारख्या अनेक सुवीरांनी प्राणाची बाजी लावून देशाला स्वतंत्र केले.

 क्रांतिकारी मंगल पांडेच्या बलिदानाचे एक ऐतिहासिक महत्त्व आहे. इंग्रजांविरुद्ध डोळे वर करून बघण्याची हिम्मत या अगोदर कुणीच केली नव्हती. त्याने असे धाडस पहिल्यांदा दाखवले. या साहसाने देश आणि मातृभूमीसाठी प्राणाची आहती देण्याची इच्छा बाळगणाच्यांच्या मनात आशेची ज्योत प्रज्वलित झाली. हे होऊ शकते, असा आशावाद मंगल पांडेनेच सर्व भारतीयांच्यात जागृत केला. त्याने किती इंग्रजांना मृत्यूच्या दारात पोहोचवलं, ही गोष्ट गौण मानली गेली पाहिजे. महत्त्व या गोष्टीला आहे की इंग्रज पराजित होऊ शकतात, त्यांना मारले जाऊ शकते, असा विश्वास त्यानेच पहिल्यांदा निर्माण केला. म्हणूनच जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याची कथा आठवली जाते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मंगल पांडेची आठवण काढली जाते. रामधारी सिंह 'दिनकरांच्याच शब्दात सांगायचे तर, म्हणावं लागेल

आकाश संवाद/५२