पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रत्येक दिवसामागे मांगल्य, समृद्धी, सदाचार, दान, परोपकारासारखी मूल्ये रुजविण्याचा हेतू स्पष्ट दिसून येतो. या सणामागील कथा किती खन्या आणि खोट्या हे आपण क्षणभर विसरून जाऊ. आपण या सणामागील भावना समजून घेणे गरजेचे आहे.
 कालची दिवाळी हा सण होता. या सणास इतर सणांसारखेच दिखाव्याचे स्वरूप आले आहे. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला सार्वजनिक गणेशोत्सव समाज प्रबोधनाचा उपक्रम होता. दिखावा आणि देखाव्यात त्याचे समाजमूल्य हरवून गेले. थोड्या फार फरकाने दिवाळी कालची राहिली नाही. कालच्या दिवाळीत साधेपणा, मांगल्य भरलेले होते. आजची दिवाळी भपक्यात आणि आतषबाजीत जेरबंद झाली आहे. कालच्या दिवाळी मागील आजचे संदर्भ शोधून आपण डोळसपणे ती साजरी केली पाहिजे.
 धनत्रयोदशीचा दिवस आज केवळ अभ्यंग स्नानाचा एक उपचार बनला आहे. या दिवसाचे खरे सामाजिक महत्त्व आपण विसरूनच गेलो आहोत. या दिवशी आपण दुसन्यासाठी काही मागावे, करावे अशी कल्पना आहे. मनुष्य रोज स्वत:साठीच मागत जगत असतो. या दिवशीचा संस्कार ‘परोपकाराय जीवनम्' असा आहे. समाजात आपल्या आजूबाजूला कितीतरी गरीब, गरजू लोक असतात. आपण तूप खाताना शेजा-याला तेल तरी मिळते का हे आपण पहायला हवे. समाजातील अनाथ, अंध, अपंगांसाठी काम करणाच्या किती तरी संस्था आहेत. त्यांना आपल्या घासातील घास देण्याचा ‘कृतिसंकल्प दिन म्हणून धनत्रयोदशीकडे आपण पाहायला हवं. या दिवशी दुस-याला अपमृत्यू येऊ नये म्हणून दीपदानाचा वर यमराजाने आपल्या दूतांना दिला, धन्वंतरीचा जन्म याच दिवशी असतो. या सर्वांमागे मानवी जीवन ‘मृत्युंजय' करण्याची कल्पना आपण विसरून चालणार नाही. आरोग्याचे अनेक संकल्प या दिवशी करून वर्षभरात आपण ते अमलात आणायला हवेत. धनत्रयोदशी परधन संपन्न करण्याचा उत्सव आहे हे विसरता कामा नये.

 तीच गोष्ट नरक चतुर्दशीची. या दिवशी कृष्णाने नरकासुरास यमसदनास धाडले. एका जुलमी, अत्याचारी असुराचा नाश झाल्याचा आनंद म्हणून ही चतुर्दशी आपण साजरी करतो. आज आपले राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक सर्व त-हेचे जीवन नाना नरकांनी व्यापून टाकलेय. समाजाच्या सर्व दिशा अंधारल्यासारखी स्थिती आहे. हर दिशेची प्रवेशद्वारे नरकासुरांनी कवेत घेतली आहेत. अनैतिकता, भ्रष्टाचार, मूल्यहीनता, बेपर्वाई, हिंसा, जातीय भेद, धार्मिक संकुचितता, पक्षीय स्वार्थ, फसवणूक एक की दोन! आपलं

आकाश संवाद/४२