पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लावलाय. ही अत्यंत दुःखद अशी गोष्ट आहे. ज्या देशामध्ये साहित्य, भाषा आणि संस्कृती विकसित असते तोच देश सुसंस्कृत मानला जातो. परत एकदा आपल्या शासनानी या सर्वांचा पुनर्विचार करायला हवा. शाळांचे अनुदान दिवसेंदिवस कमी होऊ लागलंय, सार्वत्रिक शिक्षण व सार्वत्रिक वाचन हा आपला कृतिकार्यक्रम व्हायला हवा. अलीकडच्याच काळात महाराष्ट्र शासनानी महाबळेश्वर आणि पाचगणमध्ये असलेल्या भिलार गावी ‘पुस्तकांचा गाव उभा केलाय. कल्पना काय आहे त्यामागे? लोकांनी जावे नि मनस्वी पुस्तके वाचावीत. ही फार सुंदर कल्पना आहे. हे ऑन द वे' नावाचे असेच गाव इंग्लंडमध्ये आहे. त्या धर्तीवर हे उभे केलेय. २६ छोट्या छोट्या कुटीसहश्य घरांमधून ग्रंथालयं विकसित केलीय. प्रत्येक घरात नव्या प्रकारचे साहित्य वाचायला मिळतं. एका घरात कादंबरी तर दुसच्या घरात काव्य! तिस-या घरात आत्मकथा तर चौथ्या घरात तत्त्वज्ञान वाचायला मिळेल. समाधीसारखं वाचायच्या सोयी आता शासनाने केल्या आहेत. पर्यटकांनीपण केवळ देवधर्मामागचे पर्यटन सोडून शैक्षणिक, सांस्कृतिक, संग्रहालय पर्यटन, सामाजिक उपक्रमांचे पर्यटन असे पर्यटनाचे जे नवे प्रगल्भ प्रकार आहेत ते रूढ व्हायला हवेत. अलीकडे असं मानलं जाते की 'Seeing is reading' पहाणपण वाचनच आहे. म्हणजे एक साधी गोष्ट पहाना, ‘सुजाणांना माणसं वाचता येतात' असे मानले जाते ना? मग का नाही पुस्तके वाचायची? असा प्रश्न आपणास पडायला हवा. आपण का नाही सुजाण व्हायचे?

प्रश्न - सर, तुम्ही वाचनालयांच्या स्थितीबद्दल म्हणालात की अनुदान आखडलंय परंतु विद्यापीठ स्तर असेल किंवा महाविद्यालयीन स्तर असेल वाचनालयामध्ये प्रवेश करणारा विद्यार्थी किंवा जो वाचक म्हणून वाचनालयात जातो, तो सर्व गोष्टी तिथे सुखरुपपणे हाताळू शकतो असं वाटतं का तुम्हाला?

उत्तर - हो. आता सर्व ग्रंथालयातून मुक्तद्वार योजना Open Access System ची अंमलबजावणी झालेली आहे. प्रश्न आहे तो आपले पाय तिकडे लीलया वळत नाहीत. आपल्या जीवनाचे प्राधान्यक्रम Priorties बदलले आहेत. एकविसावे शतक हे भौतिक संपन्नतेनचे शतक मानले जाते. हे शतक बौद्धिकतेचा शाप घेऊन जन्माला आलेले आहे. आपण त्यावर खल करायला हवा. नव्या पिढीत वाचनाची सवय लावण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे.

आकाश संवाद/१२७