पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारतीय साहित्याचा प्रसार


• मुलाखतकार : श्रीपाद कहाळेकर


निवेदन/प्रस्तावना

संपूर्ण भारताचा आपण विचार केला, तर या ठिकाणी नांदणारी जी संस्कृती आहे ती भाषा, धर्म, जात, रूढी, परंपरांनी वैविध्यपूर्ण असली तरी तिला एकत्र ठेवण्याचे कसब वेगवेगळ्या साहित्य कृतीमधून मिळाले आहे.

डॉ. लवटे - त्याला आता आंतरभारती संस्कृती असे म्हणतात. तर या संस्कृतीच्या बाबतीत स्वतः एक भारतीय भाषा व साहित्य अनुवाद, परिचय, समीक्षेच्या रूपात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणारे आपल्या कोल्हापूरचे साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटेजी आज आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी या विषयावर गप्पा मारूया.

अभिवादन - लवटे सर, नमस्कार!

प्रतिसाद : नमस्कार ! प्रश्न - लवटे सर, तसे पाहिले तर विश्वामध्ये असलेले साहित्य माणसाचे ज्ञान समृद्ध करण्यासाठी वापरायचं ठरवले तर खरोखर समृद्धी येईल असे आपणास वाटते का? आणि हे होताना दिसतय का?

उत्तर - हे दिसत नाही याचे कारण असे आहे की गेल्या शतकामध्ये जर्मन साहित्यावर गटे यांनी एक कल्पना मांडली होती. त्या कल्पनेला त्यांनी ‘विश्वसाहित्य' (Welteterature) अशी संज्ञा दिली होती. ती संकल्पना भारताचे एक व्यापक रूप होते. आपण जग समजून घेऊ लागलो तर लक्षात

आकाश संवाद/१२१