पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे, संस्कार व मूल्यांची अमृतेवल सुकते आहे व भ्रष्टाचाराची जंगले, विषवृक्ष फोफावत आहेत. ही भाषणे तुम्हास प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या या वास्तवाप्रती जागृत करून नव्या विधायक जीवन मांडणीसाठी प्रवृत्त करतील तर हा ‘आकाश संवाद' नव्या युगाचा ‘हृदय संवाद' बनेल. हे हृदयीचे ते हृदयी' घालण्याच्या ध्यासातून संबोधिलेली ही आकाश भाषिते तुम्ही सेवावी, विचारावी, आचरावी ही प्रार्थना!

- डॉ. सुनीलकुमार लवटे