पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शिक्षणाची नवी दिशा


• मुलाखतकार : श्रीपाद कहाळेकर

निवेदन/प्रस्तावना

देशाचा इतिहास व स्वातंत्र्याचा लढा आपण अभ्यासला तर त्यामध्ये समाजसुधारकांनी मुख्यतः भर दिला होता तो शिक्षणावर आणि या शिक्षणाच्या बाबतीमध्ये परिस्थितीची स्थित्यंतरे आपल्या समाजानी अनुभवली आणि त्यामध्ये आजही बदल होताना आपण बघतो. मुळात विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीचा जर आपण विचार केला तर या शिक्षण पद्धतीमध्ये आज आमूलाग्र बदल करण्याची गरज या विषयातील अभ्यासक सातत्याने मांडताना दिसतात. पण यासंदर्भात पावले उचलली जात नसल्याची खंत त्यांना जाणवत असते. याच विषयाचे अभ्यासक आणि प्रसिद्ध लेखक डॉ. सुनीलकुमार लवटे आज आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडूनच या विषयातले गांभीर्य जाणून जनतेने तातडीने का समजून घेतले पाहिजे हे त्यांच्याच शब्दात ऐकूया.

प्रश्न : लवटे सर, नमस्कार, मुळात मला एक सांगा, आपण म्हणतो की शिक्षणात खूप स्थित्यंतरे झाली आहेत आणि अजूनही दर क्षणाला यामध्ये बदल होताना आपण पाहतो.

उत्तर : हे खरं आहे.

प्रश्न : नेमकी आजच्या शिक्षणाची काय परिस्थिती आहे?

उत्तर : शिक्षणात काय स्थित्यंतरे झाली हे जाणून घेण्यापूर्वी आपण हे समजून घेतले पाहिजे की स्थित्यंतरे नेमकी कोणत्या क्षेत्रात नि कशा प्रकारची झाली

आकाश संवाद/१११