पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रश्न - तर एकीकडे या सर्व गोष्टी जतन करण्यासाठी पहिले क्षेत्र म्हणून साहित्य निवडलं. वि. स. खांडेकरांपासून त्याची सुरुवात झाली. मला असे सांगा की पहिल्यापासून यात कोणत्या अडचणी आल्या, जाणवल्या?

उत्तर - वि. स. खांडेकरांचे म्युझियम आम्ही करायला घेतले आणि असे लक्षात आलं की ज्या वस्तू मिळणं आम्हाला अपेक्षित होतं त्या वस्तू उपलब्ध असून काही अपरिहार्य कारणामुळे मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे आमचे पहिले म्युझियम प्रतिकृतींचे झाले. नंतर आम्हास मूळ वस्तू मिळाल्या. प्रतिकृती तयार करणे हीपण एक मोठी गोष्ट असते. नाशिकच्या मुक्त विद्यापीठात आम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांचे म्युझियम केले. तिथे यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे या जन्मगावचं जन्मघर - त्याची प्रतिकृती आम्ही उभारली आहे. देवराष्ट्र गाव नाशकात उभारणं शक्य नाही पण त्याचा आभास निर्माण करता येतो. वस्तुसंग्रहालये गतकाळास सजीव करण्याचा प्रयत्न करत असतात. गतकाळ पकडणे म्हणजे वस्तुसंग्रहालय निर्मिणे असे आम्ही मानतो. तो पकडत असताना प्रेक्षकांना त्या काळात कसे नेता येईल हे आम्ही पहात असतो. गतकाळातील वस्तू, पोषाख, छायाचित्रे, कागदपत्रे, इत्यादीद्वारे आपण काळ जिवंत करतो. यशवंतराव चव्हाण यांनी आपली लग्नपत्रिका सन १९४१ मध्ये छापली होती. पूर्वीच्या सर्व लग्नपत्रिका काढून पहा. त्यावर लिहिलेले असते... बिरोबा प्रसन्न, महालक्ष्मी प्रसन्न असे काहीबाही लिहिलेले असते. यशवंतराव चव्हाण यांच्या लग्नपत्रिकेवर त्याजागी 'वंदे मातरम्' छापलेलं आहे, आता हा संस्कार आहे की नाही? एक अठरा-वीस वर्षांचा तरुण बेचाळीसच्या लढ्यामध्ये आपल्या लग्नपत्रिकेवर 'वंदे मातरम् लिहितो. स्वातंत्र्याची इतकी वर्षे उलटल्यानंतरही आपण 'वंदे मातरम्' वर ज्या प्रकारची चर्चा करतो, ती यशवंतराव चव्हाण यांनी ज्या राष्ट्रीय भावनेने 'वंदे मातरम्' छापले होते, त्या भावनेची चर्चा नाहीये 'वंदे मातरम्'ची चर्चा देशप्रेमाशी संबंधित आहे, तिथे त्या भावनेशी ती जोडायला हवी. अभिनिवेशापोटी। कुणाला कनिष्ठ, कुणाला वरिष्ठ, कुणाला देशप्रेमी, कुणाला देशद्रोही ठरवणं अयोग्य. जतनशास्त्र आपणास राष्ट्रप्रेमाकडे घेऊन जातं. हा संस्कार आहे. वस्तुसंग्रहालये थडगी किंवा स्मारके नव्हेत. ती बदलत्या काळात नव्या पिढीस प्रेरणा देणारी ऊर्जा स्त्रोत होत अशी माझी धारणा आहे. साधी एक गोष्ट सांगतो. आम्ही पहिले म्युझियम वि. स. खांडेकरांचे केले. खांडेकरांच्याच शाळेतील विद्याथ्र्यांना... आंतरभारती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ते पहिल्यांदा दाखवलं. ओपन केलं. मला चांगले आठवतं की विद्यार्थी म्युझियम पाहून

आकाश संवाद/१०७