पान:आकाश संवाद (Aakash Sanvad).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
जतन साक्षरता


• मुलाखतकार : श्रीपाद कहाळेकर, कार्यक्रम अधिकारी,
आकाशवाणी केंद्र, कोल्हापूर


निवेदन

व्यक्तीच्या आदर्श संकल्पना पुढच्या पिढीपर्यंत जाव्यात या दृष्टीने स्मृती संग्रहालय ही संकल्पना सातत्याने जोपासणारे आणि त्याच बरोबर मोठमोठ्या साहित्यिकांच्या बाबतीमध्ये ही संग्रहालये, लोकांना कशाप्रकारे मार्गदर्शक ठरतील यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करणारे आपले कोल्हापूरचे साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे आज आपल्याबरोबर आहेत. स्मृती संग्रहालयाची संकल्पना नेमकी कशी आली, त्यामागची नेमकी कारणे काय होती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया, त्यांच्याशी बातचीत करूया.
संबोधन - सर नमस्कार!
प्रतिसाद- नमस्कार !

प्रश्न - मला एक सांगा की मुळात माणसे स्मृतीमधून दूर जातात. काही काळ लोटल्यानंतर असे म्हणतात. पण हा काळ दूर लोटू नये म्हणून प्रयत्नशील आहात. सातत्याने ही माणसं पुढच्या पिढीपुढे उभी रहावीत म्हणून तुम्ही प्रयत्न करता आहात. याच्या मागची कारणे काय आहेत ?

उत्तर - एक मला असे दिसते की, माणसाचे मन जसे चंचल असते, तसा काळ हाही चंचल असतो. आपण नेहमी म्हणतो की काळ कुणासाठी थांबत नाही. काळ कुणासाठी थांबत नाही हे खरे आहे पण काळ आपल्याबरोबर काळ पण घेऊन जात असतो. माणूस आणि निसर्गात जर मूलभूत स्वरूपाचा

आकाश संवाद/१०१