पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



रॉबर्ट



 हॉस्पिटलच्या वेटिंग रूममधे मुलाच्या जन्माची प्रतीक्षा करणाऱ्या बापासारखा मी येरझारा घालतोय. पण ज्याची मी वाट पहातोय ते मूल म्हणजे मृत्यू आहे. ॲलिसचा मृत्यू. ती न परतीच्या प्रवासाला निघालेलीच आहे, फक्त डॉक्टरांनी तिच्यातली शेवटची धुगधुगी सुद्धा उरली नाही असा दाखला द्यायचीच खोटी आहे.
 मी इथे कशाला थांबलोय ? तिच्या अचेतन शरीराला शेवटचं पहाण्यासाठी, स्पर्श करण्यासाठी ? नाही, त्याचा मला मोह नाही. मला फक्त एवढंच पहायचंय की, तिच्या शरीरावर तिच्या इच्छेप्रमाणे संस्कार होतात ना. तिच्या इच्छेनुसार तिला अग्नी देऊन नंतर तिची राख रायरेश्वरच्या दऱ्याखोऱ्यांत विस्कटायची. खरं म्हणजे ती मातीत पाय ठामपणे रोवून उभी राहणारी होती. म्हणूनच ह्या असल्या काही बाबतीतला तिचा हळवेपणा अनाकलनीय होता. तिचा मूर्ख नवरा, उदाहरणार्थ. त्याच्या बाबतीत ती हळवी नसती तर त्यांच्या लग्नात काही अर्थ उरला नाही असं पटल्यानंतर ती त्याला चिकटून राहिली नसती. अर्थात रुस्तुमशी लग्न करण्यात आपण चूक केली हे तिनं

रॉबर्ट – ३५