पान:अस्पृश्य -विचार.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६२ )

आतुरतेच्या प्रसंगी जो उपयोगी पडेल तो प्रेमाचा विषय होईल. हे उघड आहे. शेवटी, तो महद्भाग्याचा प्रसंग केव्हाही अवतरो, त्यांना श्रीविठ्ठलस्वरूप दाखवावे व हिंदुस्थानचा राष्ट्रपुरुष सर्व सामर्थ्यानिशी उभा करावा. "
 माहिती पूर्ण व्हावी म्हणून या लोकांच्या वस्तीचे जिल्हावार आंकडे व इतर प्रमुख जातीचे आंकडे पुढे एकत्र दिले आहेत. आंकड्यावरून तौलनिक ज्ञान होऊन विषयाचें खरें महत्व ध्यानांत भरेल. ज्या वाचकांनी हा लेख वाचण्याचा अनुग्रह मजवर केला असेल त्यांचे स्वतःवर व अस्पृश्यांवर सुद्धा फारच उपकार झाले आहेत. माझी काही विधाने चुकीची व अनुमाने धाडसाची असण्याचा पूर्ण संभव आहे. तोल संभाळण्याचा यत्न करून सुद्धां तो न राहिला असण्याचाही संभव आहे; कारण बोलूनचालून माझा ओढा अस्पृश्यांकडचा आहे. विद्वानांनी आणि विचारवंतांनी या विषयांत लक्ष घातले असते तर मला माझें अज्ञान व विचाराचा कोतेपणा समाजापुढे पसरून मांडण्याचा प्रसंग चुकवितां आला असता. पण माझे म्हणणे ठाकूनठोकून नीट करण्याचा यत्न आतां कोणी ज्ञानी माणसांनी केला तर खऱ्या ज्ञानी विचारवंतांना बोलावयास लावल्याचे श्रेय मला लाभेल.