पान:अस्पृश्य -विचार.pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ६१ )

नये. सद्विचार ऐकवावा व चांगल्या वाचनाची गोडी लावावी दुसरें, युरोपियन संस्कृतीचा उडालेला बोजवारा झाडून सर्व प्रजांच्या कानी घालावा. पण यांत देशाभिमानाचे वेडे वारे नसावें. अभ्यास आणि निश्चितपणा असावा. तिसरें, त्यांच्या स्वभावाचे दैन्य काढावे. तू जन्मानें नीच आहेस असे सांगू नये. त्याने माणूस दिनावतें, मान ताठर करून वर पाहूं शकत नाही. साहेबांचे दास्य करणाराचा तो दास बनतो, मग परक्यापुढे स्वाभिमानाने मान तो कशी उंचावील ? आपलें धर्मज्ञान त्याला द्यावे, आपल्या संस्कृतीत त्याला मिसळून घेऊन तिचा अभिमानी म्हणून रक्षिता बनवावा. ज्याला गमविण्यासारखे काहीच नसतें तो पुष्कळदां नवीन मतांना लवकर वश होतो. विपरीत मते परद्वीपांत चालू आहेत इकडे काळजीपूर्वक लक्ष पाहिजे. चौथे, धंद्याचा बोज वाढवावा. त्याला इतर सर्व बाबतींत मोठेपणा इतरांइतका दिला तर त्याने धंद्याची लाज बाळगू नये. मग तुम्ही त्यांना त्याच घाणेरड्या धंद्यांत ठेवू इच्छितां असा आपल्यावर कारण नसतां आरोप येईल, अशी सूचना या ठिकाणी आपल्याला यश चिंतणारा करील हे खरे आहे. पण भीति वाटते ती ही की, चढाओढीची झटापट सुरू झाली म्हणजे अधिक बुद्धिवान जाति व पैकेवाले अन्य जातीय, या माणसांनी अर्धवट टाकलेले धंदे भराभर पकडतील आणि ही बापडी मिळती भाकरी गमावील. ज्या महारेत्यादीनां जुना कोणताच धंदा उरला नाही, त्यांनी अर्थात् वाटेल ते करावे. असो. क्षत्रिय व ब्राह्मण कितीहि भांडले तरी पूर्वसंस्कृतीचे पाये उभयतांनी भरले असल्यामुळे एकी होईल म्हणून याहि बाबतीत अस्पृश्यांचा नवीन इतिहास व त्यांचे नवीन मन्वंतर सुरू होतांना स्पृश्यांनी त्यांना स्वकीय करून घेण्यासाठी त्यांच्याशी आपली नावें सलग्न करून घ्यावीत. त्यांना आतुरता उत्पन्न झाली आहे. थोडी असली तर लवकरच फार होईल. या