पान:अस्पृश्य -विचार.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६० )

कमी. कोकणस्थांना राज्यसूत्र कित्येक वर्षे ज्या कारणांनी चालविता आली त्याच कारणांनी साहेब राज्य करतो. प्रजा अजाण आहे. त्या सर्वांना उठविले पाहिजे. हा भिन्न भिन्न लोकांचा रगाडा एकराष्ट्र कसा करता येईल ? प्रस्तुत फक्त अस्पृश्यांवरच दृष्टि ठेवून विचार कर्तव्य आहे. लोकांचे एकीकरण, भौगोलिक हितैक्य, संस्कृतीचा समानपणा, रक्तसंबंध, आणि परस्परावलंबन यांनी संभवते. अस्पृश्यांशी स्पृश्यांचे भौगोलिक हितैक्य आहे. हिंदुस्थानांत फार जाति आहेत; पण त्यांची वाटणी, ऑस्ट्रियांतल्या भिन्न भिन्न जातींच्या वाटणी प्रमाणे प्रांतवार न होता, म्हणजे आसामांत सगळे ब्राह्मण, मद्रासेकडे सगळे धेड, अशी न होता, प्रत्येक गांवांत हरजातींचे लोक आहेत असे दिसेल. त्या सर्वांचा मिळून एक गांव होत असल्याकारणाने अगदी शेवटपर्यंत वस्तीच्या दृष्टीने हितैक्य आहिसे दिसेल. ही आशेला जागा आहे. सांस्कृतिक दृष्ट्या पाहतां, भाषा बर्हशी एक आहे, वाङ्मय कांहीसे त्यांनी उचलले आहे. पूर्वपीठिका मात्र त्यांच्या आपल्या एक नाहीत. पण त्यांचा अंतर्भाव समाजाच्या जुळणीत सांपत्तिक दृष्ट्या झालेला असून, धर्मात भागवत संप्रदाय ही सामान्य भूमिका उभयतांना आहे. रक्तसंबंधाने एकी होणे संभवनीय नाही. शेवटी परस्परावलंबनाने घडणारी एकी शिल्लक उरत. ही संवय आधींपासून आहे. रक्त्तसंबंधाची एकी ज़र संभवत नाही तर शेवटच्या इलाजाचा अवलंब जोराने केला पाहिजे. आम्ही तुम्हाला हवे आहोत, तुम्ही आम्हांला हवे आहांत हा भाव बळाला लावला पाहिजे. सुशिक्षितांनी अस्पृश्यांच्या हरतऱ्हेने उपयोगी पडावे. नवीन गोष्ट सुरू करावयाची म्हटली म्हणजे आपण झुलू लोकांसारखे म्हणजे असंस्कृतांसारखे करूं लागतो. परकीयांनी सांगितलेली साधने उचलतो. तसे न करतां गंजलेली हत्यारे पाजळावीत व अस्पृश्यांना शिक्षण द्यावे. नुसत्या साक्षरतेवर थांबू