पान:अस्पृश्य -विचार.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५९ )

चांभारांच्या घरी जात आहे. असो. देवळांत जबरदस्तीने शिरण्याचा मोह त्यांनी आवरला पाहिजे. येथे काही शक्तीचे प्रदर्शन नाही. जबरीने गेलांत तर तें स्थल अपवित्र झालेसें समजून इतर लोक तेथे जाण्याचे बंद करतील, किंवा तुम्हाला बाहेर काढून पुनः शुद्धिसंस्करणे करतील; म्हणजे काय की, तुम्ही पुनः दूरच्या दूरच. पण ' आम्हांला आंत घ्या ' हा लकडा मात्र निकडीने लवता येईल तितका लावावा. कारण ही मागणीच अशी आहे की, न देणारा मनच्या मनांत सारखा ओशाळा राहील. अस्पृश्यांची नांवें शिवीवाचक झाली आहेत. ती त्या अर्थाने समाजानें अतःपर उपयोजू नयेत. पण अस्पृश्यांनीही आपल्या सत्प्रवृत्तीने व गोड वाणीने समाजाच्या या प्रयत्नाला मदत केली पाहिजे. एखाद्याला अमुक एक गोष्ट तूं कर म्हणून पुनः पुनः सांगितले तर कार्यातीचे उदात्तपणा आव्हान त्याच्या उदार भावनांना पोंचून तो तें कार्य करूं लागेल; पण हे जसें एक प्रेरक कारण होते तसें तूं न करशील तर पेंचांत सांपडशील ' असे त्याला पटवून देण हेहि एक दुसरे कारण होते. अस्पृश्यतरांना एक पेंच पडणार आहे. यापुढे सगळे राज्य संख्येवर रचले जाणार आहे. ज्या ज्या मानाने संख्येचें बळ एखाद्या समाजाचे जास्त त्या त्या मानाने राज्यशकट हांकण्याचा अधिकार त्याला जास्त असे होणार आहे. या दृष्टीने वाचकांनी एकंदर जातीच्या संख्येचे आंकडे नीट ध्यानात घ्यावे. आपल्या प्रांताला ३२।।। लक्ष मराठा आहे, २४॥ लक्ष कुणबी, २० लक्ष कोळी, १४॥॥ लक्ष महार ३ लक्षांवरचाभार, २॥ लक्ष मांग , १८४ हजार बेरड, १०२ हजार वडार, ९३ हजार भंगी, ९१ हजार कातकरी अशी प्रजा आहे. नुसता धनगर जवळपास ८॥ लक्ष आहे. ब्राह्मण १०६७ हजार असून कोकणस्थ अवघा ११० हजार आहे ! पारशांपेक्षां कातकरी जास्त आणि रामोशी सारस्वतांपेक्षा थोड्याशा हजारानी