पान:अस्पृश्य -विचार.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५८ )

होणार ! म्हणून पुनः त्यांच्या धर्मबुद्धीला भीड घालावीशी वाटते. आधींच धर्म पुरेसा विदीर्ण झालेला नाहीं काय कीं त्याची आणखी ओढाओढ करावी ? इतक्यानेंहि भागेना तर मग बारा वाटा मोकळ्या आहेतच; जें झेपेल तें करण्यांत येईल. ' देऊळ, धर्म ' असे शब्द बोलले म्हणजे सुशिक्षित, उघड किंवा झाकून, तिरस्कारानें हंसतो. पण असल्या लोकांचा एक अगदी पातळ पापुद्रा आहे. खरा विराट समाज पंढरपूर, आळंदी अशा ठिकाणीं जमतो. तेथील अधिकार्यांनी हा प्रश्न सोडवला म्हणजे समाजानें सोडविला असा अर्थ होईल. सुशिक्षित काय बेफिकीर आहे. महार देवळांत आला काय किंवा न आला काय तो ही गोष्ट तितपतच मानतो, म्हणून ज्यांना त्या स्थलाच महत्व आहे त्यांनी हा प्रश्न सोडविला म्हणजे तो सुटला असा अर्थ होईल.

 अस्पृश्यांना इतकेंच सांगावयाचें कीं, समाजापासून आधींच असलेलें अंतर ज्या ज्या कृत्यांनीं जास्त होईल तीं तीं होतां होईतों त्यांच्या हातून न झालेली बरी. इतर कोणल्याहि आश्रयाच्या अभावी त्यांनी सरकारच्या पदरीं जाऊन पडावें हे अगदीं साहजिक आहे.पण तेथे असतांना सुद्धां आपल्याला स्वतःच्या समाजातच चिरकाल नांदावयाचें आहे हें त्यांनीं विसरतां उपयोगी नाहीं साहेब काय आज आहे उद्यां नाही; या काळाच्या उलथापालथीत असा प्रकार केव्हांना केव्हां ठेवलेलाच आहे. तसेंच स्वराज्यार्थ होत असलेल्या झगड्याचा फायदा त्यांना निश्चयानें होणार आहे.त्यांनी जागरूकता मात्र अखंड ठेवली पाहिजे. अस्पृश्यांचें हितच जर सरकारास साधावयाचे असते तर निदान चांभारांना आणि मांगांना त्याच्या विद्या आधुनेिक पद्धतीने शिकवून परदेशी जात असलेला कोट्यवधि खजिना त्यांच्याघरात घालता आला असता. पण तो सर्व पैसा युरोपीय मांगा-