Jump to content

पान:अस्पृश्य -विचार.pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३ )

उत्पन्न करतो, असे. बहुजनसमाज जरी या बाबतींत उदासीन आणि विरुद्ध असला तरी या अजाणिवेच्या निशेंत समाज निजलेला असतांना कोणी कोणी विचारसंयमी जागे राहिले होते; आणि मधून मधून आपल्या जागेपणाची आणि रात्रीच्या अमलाची खूण त्यांनीं झोंपमोडीबद्दल होणारी अप्रियता संपादूनसुद्धां समाजाला दिली होती. ज्या वेळीं समाज पाहत नाही, त्या वेळीं जो पाहतो, तोच पाहतो. अशा पाहणारांची संख्या कमी होती म्हणूनच सामाजिक परिषदेच्या ठरावाकडे कोणी फारसे लक्ष देत नसे. पण कमी असो की जास्त असो, या लोकांच्या कर्तबगारीमुळे काँग्रेसला हा विषय पत्करावा लागला असे म्हटल्यास त्यांच्या कर्तबगारीच्या वर्णनापेक्षां आपण कांहीं जास्त केलें असे होत नाही. समाजानें आपली केलेली हेटाळणी, प्रतिकूल परिस्थतीमुळे वारंवार होणारा कोंडमारा, स्वतःच्या सद्धेतूसंबंधानें उत्पन्न झालेलीं अगर उपस्थित केलेला विपरीत मतें या सर्व गोष्टी मावळून जाऊन, आपल्याला ज्याची अयंत आस्था तो विषय सर्वसाधारण जनसमूहाच्यासुद्धां आदरयुक्त विचाराला पात्र झाला हे पाहून आपलें सुभाषित आपल्याच अंगीं जीर्ण होईल की काय अशी आजपर्यंत भीति बाळगणारा सुधारकवर्ग खरोखर प्रमुदित झाला असेल यांत शंका नाही. पुढील राजकारणी अवतरले म्हणजे मागचे मागे पडून, त्यांनीं अडविलेली लोकांच्या मनांतील जागा पुढिलांच्यासाठी रिकामी व्हावी, नवा सुधारक आला म्हणजे त्याच्या तेजांत मागला लपावा हा सृष्टीचा क्रमच आहे. पण सामान्य माणसाची दृष्टि जरी याप्रमाणे नित्य नवीन येणार्‍या फिल्मवर चिकटलेली असली तरी एकाद्या वस्तुची वाढ निरीक्षावयास शिकलेल्या जागरूक डोळसाला हें स्पष्ट दिसतें कीं, हा एक तऱ्हेचा श्रमविभाग चाललेला आहे. एकाद्या तत्वाच्या अगर मताच्या पूर्ण उत्कर्षाला शंभर वर्षांचा किंमत पड