पान:अस्पृश्य -विचार.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५४ )

ठरविले, आहिंसा घरांत घेतली, नागपूजा स्वीकारली, लिंगपूजा मानली असे परत जातां जातां वर सांगितलेल्या विस्मृतीच्या अरण्यांत कालनदीच्या काठी शिवमंदिरांत त्याच्याच साक्षाने आर्य व अनार्य यांची दिलजमाई होतांना दिसली. हरिभक्तांनी या लोकांना वर ओढले. त्याच्या आधी रामानुजासारख्यांनी देवळाची द्वारे त्यांना खुली केली, व त्याहि मागें शिवपूजा उभयतांनी मानून एकीचे बीज घातले; असा हा अत्यंत मंगल प्रसंग आहे. तो मनांत कल्पून त्यावर वाङ्मयाचा मोहोर कितीहि वाहिला तरी पुरा पडणार नाही असे त्याचे महत्त्व आहे.
 उभय लोकांना समानाधिष्ठान काय असेल ते शोधावे हे माझे मनोगत चाणाक्षांना सहज दिसण्यासारखे आहे. या बाबतींत रा.चिंतामणराव वैद्यांच्या उपसंहारांतील १२ व्या प्रकरणांपैकी शिव व विष्णु हा भाग अवश्य वाचावा. आम्ही त्यांचा शिव घेतला व आमचा विष्णु-विठु विठोबा त्यांना, अर्धवट का होईना, दिला अशी ही देवघेव आहे.
 आता उरल्यासुरल्या शंका-कुशंकांना उत्तरे देऊन उपसंहारभूत चार विचार लिहून आटपते घेतों.
 पुष्कळांना असे वाटते की, हे अस्पृश्यतानिवारणाचे खेकटे आपण होऊन तुम्ही कां पिकवीत बसता ? याला दोन उत्तरें आहेत. एक-केवळं आम्ही पिकवितो हे खोटें आहे. पिकविले असते तरी बहावेचेच काम झाले असते; पण खुद्द अस्पृश्यांना आपली हीन स्थिति कळत नाही असें आक्षेपकांना वाटते काय ? स्वतः ते ओरडत उठलेच आहेत. दुसरे असे की, ते उठत नसले आणि आम्ही आहों तेच बरे आहो असे जरी त्यांना वाटत आहेसे मानले तरीसुद्धा आम्ही त्यांना आपण होऊन उठविले पाहिजे.कारण असलें मनोदौर्बल्य राष्ट्राच्या नवीकरणाच्या आड येईल. त्यांना