पान:अस्पृश्य -विचार.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५३ )

दिसू लागले. अर्थात् देवघेवीशिवाय शेजारधर्म कधीहि संभवत नसल्यामुळे ती सुरू झाली, सामान्य लोकांनी लिंगपूजा काले करून पतकरली आणि वेदांतील रुद्रकल्पना शिवाशी संलग्न करण्यांत आली. ही देवघव इतकी झाली की, शिव मोठा की विष्णु मोठा असेंहि तंडण सुरू झाले ! पण सर्व उदात्त कल्पना एक ठिकाणीच भेटतात ही अत्यंत विशाल तत्वभावना रूढ होऊन तोही तंटा मिटला. पण इतके झाले तरी शिवाची संहारबुद्धि नरांच्या मनांत रुतून बसली होती तीमुळे शेवटी प्रळयाचे आणि संहारकाच काम त्रयीपैकी महेशाकडेच राहिले. शिवालाहि आर्यकुलोद्भव रामचंद्राच्या चरिताने शांति प्राप्त झाली आणि लोकांनीहि शिवस्वरूप सर्वत्र पूजनीय मानले, ते इतकें की आज अवघ्या भरतखंडांत यात्रेचें आदिस्थान जी काशी त्या ठिकाणी शिवाचे लिंग आहे. उंच उंच टेकड्यांचर शिवाची लिंगे स्थापन करून हिंदु लोक त्यांची पूजा आज सहस्रावधि वर्षे करीत आहेत. सर्व पुराणकथांचा आणि तत्सम वाङ्मयाचा निर्झर शिवाच्या निर्मल वाणीतून उमटला आहे. आणि औदार्य, धीरोदात्तता, गांभीर्य, ऋजुता इत्यादि गुणांचे निवासस्थान म्हणून त्याची आराधना सर्वत्र होत आहे. अनार्यांच्या देवतेचा आर्यांवर हा केवढा विजय ! उभय लोकांच्या धार्मिक कल्पनांच्या दोरकाचा ग्रंथी म्हणजेच हे शिवलिंग होय. बाहेरच्या जड संसारांत ज्याप्रमाणे, त्याप्रमाणेच या अवश्य आणि केवळ कल्पनागम्य मुलखांत आर्यांनी आणि अनार्यांनी हातात हात घातले व शेजारधर्म कायमचा पतकरला. आपण हिंदु लोक धर्मकल्पनांत अथवा देवताकल्पनांत अत्याग्रहखोर नाही. आपल्या अंगी संग्रहक्षमता फार आहे. भूतकालाकडे तोंड करून कालाची ही विशाल नदी पाहिली म्हणजे तिला शेकडों वाकणे दिसतात. पिराची पूजा घेतली, राम रहिम एक असा उपदेश केला, बुद्धाला अवतार