पान:अस्पृश्य -विचार.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( )

गुणाढ्य असेल आणि हिमालयाच्या आसपासच्या वस्तीने गौरवर्णहि असेल. त्याला हिमालयांतील आर्य दक्षाची कन्या पार्वती भाळली. शिव असेल गुणी, बिनविशोभित; पण म्हणून आर्य दक्षाला हे कसे आवडावें ! हाबसाणाचा राजा उत्तरेकडे राहून कांही उजळला म्हणून त्याला भाळलेली आपली पोर जर्मन सम्राट् काय जवळ करील ? दक्षाने पार्वतीला माहेरसुद्धा दूर केलें. लग्नकार्यातसुद्धा तो तिला मूळ धाडीना, जामातांना निमंत्रण तर दूरच राहिले. फुणकारा लागलेल्या स्वाभिमानाने शिव वेडावून गेला आणि त्याने दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. अनार्य लोकांनी आर्यांच्या यज्ञावर नजर राखून त्यांचा विध्वंस केल्याच्या तक्रारी ब्राह्मणांनी आपल्या राजकडे नेल्याच्या कथा पुराणभर पसरल्या आहेत. यज्ञविध्वंस ही खणखणित खूण शिवस्वरूप यथार्थ दाखविते. शिवाचे मुख्य शत्रु म्हणजे काम आणि क्रोध. भक्तराजाच्या ठिकाणी त्याच गोष्टींचे वास्तव्य. क्रोध असा अनावर की, एकदां सेवा चुकली की अरिष्ट ओढवावयाचें ! आणि कामाविषयीं तर लिहावयासच नको. शेवटी चिक्कू बापाचा मुलगा उधळ्या निघावा त्याप्रमाणे बापाचा हा कैफी लंपटपणा पाहून वडील मुलाने शिसारी खाल्ली आणि ' मला जी स्त्री पाहील ती सप्तजन्मी विधवा होईल ' असा शाप उच्चारून तो भुईआड तोंड करून राहिला ! वरील प्रवृत्तीचा इतका गडद रंग मनाला असणे हे मनाच्या उंचीचे मापक असते. अनार्यांनी आपला देव असाच रंगविला.
 पण हे कसेहि असले तरी शिव म्हणजे ' नरां ' ना मोठ्या वचकांत ठेवणारा अनार्यपक्षपाती होता यांत शंका नाही. दोन प्रकारचे लोक शेजारी शेजारी आल्यावर आणि कोणीच कायमचा नष्ट होण्यासारखा नाही हे ठरल्यावर पहिल्या वैरभावाचा जोर नरम पडूं लागला; आणि एकमेकांशिवाय गत्यंतर नाही असें राष्ट्रीय संसारांत