पान:अस्पृश्य -विचार.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५० )

तील स्वारस्य येथे चांगले प्रत्ययास येऊन लोकांवरून दैवतांविषयी अनुमान करण्यांत चूक होणार नाहीसे वाटते. रामायणमहाभारतादि ग्रंथांत या दोन लोकांच्या एकमेकांशी झालेल्या चकमकींची जी कथांतर्गत वर्णने आहेत त्यावरून अनार्यांची स्वरूपें, त्यांच्या प्रवृत्ति याविषयी बरीच माहिती मिळते व तीवरून पाहतां भक्त व दैवत यांच्यांतील ताळमेळ अनुमानप्रवर्तक होतो.
 शिवाचे ध्यान व परिवार ही मोठी बोधक आहेत. त्याच्या गळ्यांत 'नररुंडमाला' आहे आणि त्याच्याभोवती 'भूत-पिशाच्च ' इत्यादींचा मेळा आहे. विशाल नेत्र, गोरापान रंग, उंच नाक आणि बुद्धिवैभव इत्यादींनी युक्त अशा आपल्या रूपाशी मूळच्या लोकांची रूपडी तोलून पाहून स्वतःला ' नर ' शब्दाने व तदितरांना ' वा-नर ' म्हणजे ' कदाचित माणूस ' शब्दाने आर्यांनी संबोधिले असावे. विजेत्या रूपसंपन्नांनी जित अशा रूपहीनांना तिरस्कारव्यंजक नांवे द्यावीत हे साहजिक आहे. मग त्या जितांच्या अंगी काही चांगले गुण असोत वा नसोत. आतां या ' नरां ' नी चोहोकडे कबजा घेण्याचे काम सुरू केल्यावर प्रत्येक ठिकाणी त्यांना कोपराने खणण्यासारखी मऊ जमीन सांपडली असेल असें नाही. कितीहि असंस्कृत असले तरी या ' भूतपिशाच्चवानरांच्या ' अंगी झगडण्याचे सामर्थ्य असलेच पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आपल्या शत्रूच्या घोर कत्तली करून विजयोत्साहाचे चिन्ह म्हणून ' नरां ' च्या मुंडक्यांची माळ आपल्या दैवताला वाहिली असेल अगर त्यांच्या पुढाऱ्याने आपल्या गळ्यात बेहोष आनंदाच्या भरांत ती घालून नृत्य केलें असेल. उपऱ्या उपटसुंभांची दाणादाण करणारा असा हा पुढारी त्यांना प्रिय अथवा दैवतसम वाटावा यांत काय नवल ? शत्रूच्या मुंडक्यांचे बुरुज बांधणे आणि त्यांची उडविलेली डोकी भाल्यावरून मिरविणे हे आधुनिक इतिहासांतील प्रकार वाचले