रूपाने मिळतो. शिवाय सध्या बव्हंशी बुडालेले पण परंपरेला माहीत असलेले, असे ५२ हक्क महाराला आहेत; पैकी काही खाली देतो.
(१) उसाच्या फडाचा भाग (२) वेशीवरचे उतारे (३) होळीवरचा नैवेद्य (४) बेंदराच्या दिवशी धान्य (५) जनावराची कातडी (६) हात शेकणे म्हणजे गुऱ्हाळाच्या चुलवणाखाली जाळ घालण्याबद्दल (७) घरटक्का (८) प्रेतासाठी खड्डे खणण्याबद्दल पैसा (९) खळ्यावरचा दाणा (१०) पेवतळचा दाणा (११) चौरंगावरचे तांदूळ (१२) रखवालीसाठी वहाणांचा जोड (१३) लग्नाची ओटीदक्षणा (१४) मळणीची ओटी (१५) नवरानवरीची ओंवाळणी (१६) मढेपडे (१७) आषाढीकार्तिकी प्रतिपदेस खेड्याभोवती दोरा गुंडाळण्याबद्दल (१८) रानसोडवण म्हणजे पिके कापून गंज करतांना कणसे मिळावयाची (१९) लगीनटक्का इत्यादि.
वर अस्पृश्यांपैकी बहुतेकांच्या शास्त्रीय व अशास्त्रीय कल्पना, तसेच त्यांच्या चालीरीति व धंदे याविषयींची वाचनांत आलेली माहिती थोडक्यांत दिली आहे. ज्यांना ही पसंत अगर कबूल नसेल त्यांनी ती मानूं नये. चवकशाने अथवा अभ्यासाने 'खरी' असेल ती मिळवावी व तिची अधिक विश्वास्यता दाखवावी म्हणजे लोकतीच जास्त मानूं लागतील, हे उघड आहे, असो, या दिलेल्या हकीकतीवरून काय अनुमाने निघतात तें आतां पाहूं.
वर निरनिराळ्या अस्पृश्य जातीतील आडनावांपैकी काही नांव मुद्दामच दिली आहेत. त्यांची मनोरंजकता त्यांच्या उपयुक्ततेमुळे भासमान होते. त्या नांवांत कोंकणस्थ, देशस्थ, प्रभु, मराठे इत्यादि श्रेष्ठ जातीतील आडनांवांपैकी किती तरी आढळतात. ही नांवे लावणारे अस्पृश्य जर अनार्य तर ती त्यांनी कोठून आणिली? काही नांवांच्या व्युत्पत्तीवरून ती त्यांची मुळचीच होती या अनुमानाला बाध येतो, कारण आर्यांच्या प्राचीन इतिहासांतील कित्येक
पान:अस्पृश्य -विचार.pdf/50
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ४७ )