लक्ष जास्त वेधलें आहे. जो गृहस्थ आपल्याला पसंत व जरूर त्या राजकारणाविषयीं इतकें बोलतो व करतो तोच अस्पृश्यतेसंबंधानेही सांगू लागला म्हणजे त्याचे म्हणणे खरे आहे असे वाटूं लागावें, त्या विषयाला कांहीं जातिवंत व स्वयंभू महत्त्व आहेसें पटावें व निदान स्थानमाहात्म्य म्हणून, सभागौरवासाठी म्हणून, मुग्ध नापसंतीनें ताठरलेली आपली मान बहुजनसमाजाने अलंकारिक रीत्या पसंति दाखविण्यासाठी डोलवावी हें बरोबर आहे. पसंत अस की नसो, काँग्रेस व गांधी यांनी हा विषय गळी बांधला हें खरें. आतां तो गळीं उतरावयाचा राहीला आहे. एकाद्या मोठ्या थोरल्या लोकप्रिय कंपनीने आपल्या आजपर्यंतच्या तपाचा फायदा घेऊन, अगर भावी यशाकडे व स्वार्थाकडे लक्ष देऊन, साधारणतः अप्रिय मजकुराचें चोपडे प्रसिद्ध केल्याने या चोपड्याचा प्रसार, प्रसिद्धि आणि आदर ही जशीं आपोआपच प्राप्त होतात तसाच कांहीसा प्रकार राष्ट्रीय सभेने अस्पृश्यतेच्या केलेल्या पुकाऱ्यात झालेला आहे. तिच्या बोजामुळे लोकांनीं आदरभावाने ऐकले व राजकारण हा जो तिचा पेशा त्यांत तेढ पडतां उपयोगी नाही अशा धोरणानें तिने सदुपदेश केला. महात्मा गांधी यांनी मात्र राजकारणापेक्षांहि आपल्याला उंच वाटणाऱ्या धर्मबुद्धीनें प्रेरित होऊन या विषयाला उचल दिली.
पण काँग्रेसनें व गांधींनी हा पुरस्कार करावयाच्या आधी आमच्या समाजाचे मन काय अगदीं स्वस्थच बसलें होतें? आमची प्रचंड लोकसंख्या ही कांहीं कांहीं प्रसंग मोठी गैरसोयीची आहे असें वाटू लागते. कारण आपत्तिनिवारणाच्या कामी एवढा मोठा डोंगर मानमोड करणारा वाटतो. पण तोच लोकसंख्येचा अफाटपणा उपययोजनेच्या, चिंतनाच्या आणि अंमलबजावणीच्या कामीं असंख्य मनांच्या असंख्य ठेवणीमुळे व सामर्थ्यामुळे कार्यात सुकरता
पान:अस्पृश्य -विचार.pdf/5
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २ )